US, सोव्हियत संघानंतर सुमारे अर्ध्या शतकानंतर चीन उचलणार चंद्राची माती; होणार नवीन खुलासे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुमारे अर्ध्या शतकानंतर चीन प्रथमच चंद्रावरून माती, दगडाचे सॅम्पल कलेक्ट करणार आहे. यापूर्वी असे अमेरिकेने अपोलो काळात 1976 मध्ये केले होते. चीनचे स्पेसक्राफ्ट चांगई-5 भारतीय वेळेनुसार मंगळवारी म्हणजे एक डिसेंबरच्या रात्री 8.45 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरले. हे यान 23 नोव्हेंबरला चीनने चंद्रावर जाण्यासाठी रवाना केले होते.

चीनचे चांगई-5 रोबोटिक स्पेसक्राफ्ट (Chang’e-5 Spacecraft) चंद्रावर अशा ठिकाणी उतरले आहे, जिथे अगोदर कोणतेही मिशन पाठवले गेले नव्हते. हे रोबोटिक स्पेसक्राफ्ट काही आठवड्यांनंतर पृथ्वीवर परत येईल. याच्यासोबत चंद्रावरील माती येणार आहे. म्हणजे 1976 नंतर प्रथमच पृथ्वीवरील लोक चंद्राची माती पाहतील. जगभरातील शास्त्रज्ञ यावर रिसर्च करण्यासाठी तयार आहेत.

सायन्स न्यूज वेबसाइटनुसार एरिजोना युनिव्हर्सिटीच्या प्लॅनेटरी सायंटिस्ट जेसिका बार्न्स म्हणाल्या की, लोक चंद्राच्या विविध भागात अपोलो काळापासून जात आहेत. तेथून माती आणत आहेत. यावेळी चीन घेऊन येईल. आनंदाची गोष्ट ही आहे की, मोठ्या कालावधीनंतर असे होत आहे. जेसिका बार्न्स यांनी अमेरिका आणि सोव्हियत संघाने आणलेल्या चंद्रावरील मातीच्या सॅम्पलवर रिसर्च केला आहे.

चांगई-5 स्पेसक्राफ्ट 23 नोव्हेंबरच्या रात्री साऊथ चायना सीमधून लाँच करण्यात आले होते. चायना नॅशनल स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचे चांगई-5 स्पेसक्राफ्ट चंद्राच्या अशा पृष्ठभागावर उतरले आहे, जेथे करोडो वर्षांपूर्वी ज्वालामुखी होते. हा चंद्राचा उत्तर-पश्चिम परिसरार आहे, जो आपल्याला डोळ्यांनी दिसतो. चीनने आपले मिशन अंधाराच्या भागात पाठवले नाही.

वुहान येथील चायना युनिव्हर्सिटी ऑफ जियोसायन्सेसचे प्लॅनेटरी सायंटिस्ट लाँग जियाओ म्हणतात की, चांगई-5 स्पेसक्राफ्टमध्ये एक ड्रिलर आण एक चमचा लावला आहे, जो चंद्राचा पृष्ठभाग खोदून सुमारे 2 किलोग्रॅम माती आणि छोटे दगड कलेक्ट करेल. याचा ड्रिलर चंद्राच्या पृष्ठभागावर 2 मीटर खोलपर्यंत खोदकाम करू शकतो.

चांगई-5 स्पेसक्राफ्टची मोठी अडचण ही आहे की, यामध्ये कोणत्याही प्रकारचे अंतर्गत गरमी देणारे मॅकेनिझम नाही. म्हणजे चंद्राच्या मायनस 170 डिग्री सेल्सियसच्या रात्रीला ते सहन करू शकणार नाही. याचे पूर्ण मिशन एक लूनर दिवसासाठी आहे. म्हणजे पृथ्वीच्या हिशेबाने त्याच्याकडे केवळ 14 दिवसांचा वेळ आहे.