पुण्यात दोन गटात तुंबळ हाणामारी, 4 दुचाकी जाळल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – उरुळी देवाची येथे किरकोळ भांडणातून चार दुचाकी जाण्याचा प्रकार आज (गुरुवार) दुपारी अडीचच्या सुमारास घडला. ही घटना हांडेवाडीतील मयूर पार्क सोसायटी समोर घडली. या घटनेत पाच ते सहा जखमी झाले आहेत.

हांडेवाडी येथे दोन गटांमध्ये भररस्त्यावर तुफान हाणामारी झाली. यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली. या वादातून चार दुचाकी जाळण्यात आल्या. या घटनेत पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. भांडण करणाऱ्यापैकी काही तरुणांनी दुचाकींना आग लावली. यावेळी बिट मार्शल घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत राडा घालणारे तरुण फरार झाले. या घटनेतील आरोपींचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती लोणीकाळभोर पोलिसांनी दिली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/