मावळते पोलिस आयुक्त डॉ. के वेंकटेशम यांनी मानले पुणेकरांचे विशेष आभार, म्हणाले….

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्याचे मावळते पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी पुणेकरांचे विशेष आभार मानले. प्रत्येक गोष्टीत दिलेली साथ आणि काम करण्याची मिळालेली संधी, यासाठी ते त्यांनी आभार मानले आहेत. तर पुण्याचा प्रवास हा मला सतत आठवणीत राहील असा विस्मयकारक असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

गृहविभागाने गुरुवारी रात्री राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात पुणे पोलीस आयुक्तांची देखील बदली केली. नुकतीच डॉ. व्यंकटेशम यांना दोन वर्षे पूर्ण झाली होती. त्यांनी केलेल्या कामाचा राज्यात गवगवा झाला. तर पुणेकरांसाठी विविध उपक्रम सुरू केले. प्रत्येक गोष्ट त्यांनी जनमानस समोर ठेवून केली. पुणेकरांनी देखील त्यांना वेळोवेळी साथ दिली. विशेष म्हणजे, हेल्मेट सक्तीला विरोध करणाऱ्या पुणे करांनी त्यांना हेल्मेट घालण्याची चांगली सवय लावली. तर दुसरीकडे आतापर्यंतचा सर्वाधिक हेल्मेट दंड देखील केला. पुणेकरांनी भरपूर साथ आणि प्रेम दिल्यानंतर पुणे पोलीस आयुक्तांनीही पुणेकरांवर तितकेच प्रेम केले. त्यांनी गरीब, उच्च असा भेदभाव न करता सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाला न्याय मिळेल हे त्यांचं पहिल काम. पण ते तितक्याच लवकर मिळेल यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

बदली झाल्यानंतर मावळते आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी पुणेकरांसाठी एक एसएमएस केला आहे. त्यात आभार मानताना म्हंटले आहे की “पोलीस खात्यातील आमच्या नाविन्यपूर्ण प्रयोगांना दिलेल्या सह कार्याबद्दल, गरजुंची सेवा करण्यासाठी ही मोठी संधी दिल्याबद्दल. तसेच आम्हाला जेव्हा गरज होती तेव्हा प्रोत्साहन दिल्याबद्दल. समजून घेतल्याबद्दल आमचा प्रामाणिक हेतू आणि झालेल्या चुकाही. तर पोलीस विभाग व गुन्हेगारी नियंत्रणात आम्हास नवीन मापदंड व पोलिस कार्यपद्धती प्रस्थापित करण्यास अनुमत केल्याबद्दल. आमच्या वेळोवेळी दिलेल्या अहवालांच्या निकालावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्याबद्दल. माझ्या मराठी भाषेच्या ज्ञानात भर घातल्याबद्दल.
आपल्या सेवाकार्यात (पो.उप.आयुक्त, पो.अधिकारी व कर्मचारी) वचनबद्धतेने व संघभावना ठेवून काम करून पुणे शहर सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल”. असे म्हणत आयुक्तांनी “पुण्याकडून मिळालेल्या निर्व्याज आणि निखळ प्रेम मिळाले,” त्यामुळे मला सतत आठवणीत राहील असा हा विस्मयकारक प्रवास असल्याचे त्यांनी म्हटले आहे.