इंदापूर तालुक्यातील रणरागीणींचा पाण्यासाठी निरा-डावा कॅनलवर मोर्चा

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – धरण उशाला आणी कोरड घशाला अशी परिस्थिती इंदापूर तालुक्यातील वडापूरी व परिसरातील आजुबाजुच्या गावाची पाण्यासाठी झाली आहे. वडापुरी (ता. इंदापूर) येथील पाझर तलावात पिण्यासाठी पाणी सोडावे या मागणीसाठी गेल्या दोन-तीन दिवसांपासून वडापुरी व परिसरातील शेकडो महीला वडापूरी ग्रामपंचायत कार्यालय समोर हंडा,कळशी घेवुन बेमुदत उपोषणाला बसलेल्या आहेत. सलग तीन दिवस उपोषण करूण देखील प्रशासनाकडून पाण्याबाबत न्याय मिळत नसल्याने उपोषण कर्त्या महीलांनी चौथ्या दिवशी वडापूरी नजिक असणार्‍या रामकुंड येथील अभंगवस्तीच्या जवळील निरा डावा कालव्याच्या कॅनॉल वरती पोहचल्या व जो पर्यंत तळ्यात पाणी सोडणार नाही तो पर्यंत या ठिकाणावरून उठणार नाही तसेच कालव्याच्या आवर्तनाच्या पाण्यात शरिराला दगड बांधून उड्या घेण्याचा पवित्रा घेतल्याने शासकीय अधिकारी व राजकारण्यांचे धाबे दणानले.

या उपोषणा दरम्यान आमदार दत्तात्रय भरणे, मा. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी उपोषण कर्त्या महिलांची भेट घेऊन पाणी सोडण्याबाबत जिल्हाधिकारी व संबंधित खात्याला फोन वरून मागणी केली होती तरी सुद्धा पाणी सुटले नसल्याने महिला आक्रमक झाल्या होत्या. सलग तीन दिवस उषोषण करून देखील उपोषणाची दखल संबधीत प्रशासनाने न घेतल्याने उपोषणास बसलेल्या शेकडो महिला आक्रमक झाल्या व हातात रस्सी व विटा घेऊन रामकुंडजवळील निरा-डाव्या कॅनॉल मध्ये उड्या मारायला कॅनालवर पोहचल्या. पाझर तलावात पाणी सोडण्यासाठी प्रांताधिकारी, पाटबंधारे खाते, व जिल्हाधिकारी यांना पत्र व्यवहार केला असून आदेश आल्यानंतर पाणी सोडण्यात येईल असे प्रशासनाच्या वतीने आश्वासन देण्यात आले. परंतु जोपर्यंत पाणी सोडणार नाही तोपर्यंत याच ठिकाणी थांबणार असल्याची भूमिका महीलांनी घेतल्याने अधिकारी सुद्धा महिला पुढे हतबल झाले होते.

यावेळी तहसीलदार सोनाली मेटकरी, गटविकास अधिकारी विनायक गुळवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबिले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, निरा डावा कालव्याचे उप विभागीय अभियंता अजित जमदाडे, आर, डी झगडे यावेळी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबिले व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी महिलांना प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले परंतु महिला पाणी सोडण्याच्या मागणीवर ठाम राहील्याने सर्वांचीच पाचावर धारण बसल्याचे चित्र पहायला मिळाले. यावेळी मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी उप विभागीय अभियंता अजित जमदाडे म्हणाले, की मा. जिल्हाधिकारी यांच्या लेखी आदेशानंतर वडापुरी येथील पाझर तलावात पाणी सोडण्यात येईल. परंतु संतप्त झालेल्या महिलांनी निरा डावा कालव्यावरील आंदोलन पुन्हा ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू ठेवणार असल्याचे महिलांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –