पालकमंत्री शिंदे यांना धक्का, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादीत जाणार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – निवडणुकीचा बिगुल वाजताच पालकमंत्री राम शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत मोरे यांचा राजीनामा राष्ट्रवादी मध्ये करणार प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मोरे यांचे कर्जत-जामखेड मतदारसंघात चांगले प्रस्थ होते.

विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. जामखेड-कर्जत मतदारसंघातील भाजपचे उमेदवार विद्यमान मंत्री राम शिंदे यांना मोठा धक्का बसला असून, त्यांचे अत्यंत जवळचे आणि मागील विधानसभा निवडणुकीत प्रमुख म्हणून काम केले. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष आणि पंचायत समिती विद्यमान राजश्री मोरे यांचे पती सूर्यकांत मोरे यांनी राजीनामा दिला आहे.

राम शिंदे हे कार्यकर्त्यांनी मोठे होऊ नये, म्हणून काम करीत आहेत. फक्त निवडक कार्यकर्ते आणि त्यांचे स्वीयसहायक यांच्या मर्जीने त्यांचे कामकाज चालू आहे. अनेक कार्यकर्त्यांना डावलले जात आहे. त्यामुळे पक्षात राहून गळा घोटण्यापेक्षा पक्षाच्या बाहेर पडणे मनाला पटत असल्याने पक्षत्याग करत असल्याचे सूर्यकांत मोरे यांनी स्पष्ट करत आपला राजीनामा पक्षाकडे सादर केला आहे. येत्या २३ तारखेला सूर्यकांत मोरे अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत.

Visit :- policenama.com

You might also like