अहमदनगर : हुल्लडबाज गुंड कार्यकर्त्याला ‘एमपीडीए’, जगताप गटास धक्का

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – हुल्लडबाज गुंड कार्यकर्ता सूरज जाधव याच्याविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करून त्याला नाशिक मध्यवर्ती कारागृहात एका वर्षासाठी स्थानबध्द करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी सादर केलेला प्रस्ताव जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मंजूर केला आहे. जाधव याच्यासह विकी उर्फ मुन्ना महेश शिंदे (रा. निघोज निमगाव, ता. राहाता) याच्याविरुद्धही ‘एमपीडीए’ नुसार कारवाई करण्यात आली आहे. जाधव याच्याविरुद्ध कारवाई केल्याने जगताप गटास मोठा धक्का मानला जात आहे.

शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांविरुद्ध ‘एमपीडीए’ नुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार शहरातील विविध पोलिस ठाण्यांकडून कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात येत आहेत. सूरज जाधव याच्याविरुद्ध शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वी त्याने एका पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलास मारहाण करून खुनाचा प्रयत्न केला होता. सूरज जाधव याच्याविरुद्ध ‘एमपीडीए’नुसार कारवाईचा प्रस्ताव पोलिस प्रशासनाच्यावतीने सादर करण्यात आला होता. त्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मंजुरी दिली आहे. निवडणूक काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जगताप समर्थकास मोठा धक्का मानला जात आहे.

सूरज जाधव हा जगताप यांचा जवळचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जाते. हुल्लडबाज कार्यकर्त्यांवर ‘एमपीडीए’ नुसार कारवाई झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी