अहमदनगर : ‘आम आदमी’ जिल्ह्यातील ‘या’ पाच जागा लढविणार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहे. नगर जिल्ह्यातील बारा मतदारसंघांपैकी पाच मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणार आहे, असे आपचे उत्तर महाराष्ट्र प्रचारक तथा नगर विधानसभा मतदारसंघाचे पक्षनिरीक्षक योगेश कापसे यांनी आज सांगितले आहे.

नगर जिल्ह्यातील नगर शहर, कर्जत-जामखेड, पाथर्डी-शेवगाव, राहुरी, संगमनेर या ठिकाणी आप निवडणूक लढवणार असून आज या मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकास कामे झाले असून त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातही विकासाच्या दृष्टीने पावले उचलण्यासाठी आपचे उमेदवार या निवडणुकीत रिंगणात उतरणार आहेत.

येत्या दहा तारखेपर्यंत अंतिम यादी जाहीर होणार आहे. इच्छुक सर्वांच्या मुलाखती घेऊन दहा तारखेला पहिली यादी जाहीर होणार आहे. शेतकरी आत्महत्या, आर्थिक मंदी आणि या खोटा सरकारविरुद्ध निवडणुकीच्या काळात आवाज उठवणार असून निश्चितच जनता आमच्या मागे राहील, असा विश्वासही यावेळी प्रचार समितीचे जावेद काझी यांनी विश्वास व्यक्त केला आहे. या पत्रकार परिषदेला प्रवीण माने, जिल्हा संघटक रवी सातपुते, युवा अध्यक्ष सुशील शेळके आदी उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त –