तामिळनाडू : AIADMK ने केली मोठी घोषणा ! 2021 च्या विधानसभा निवडणुका भाजपबरोबर लढविणार

चेन्नई : पोलीसनामा ऑनलाइन  –   भारतीय जनता पार्टीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. पश्चिम बंगालनंतर गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या चेन्नईच्या दौर्‍यावर पोहचले आहेत. त्यांच्या या दौर्‍यानंतर एआयएडीएमकेकडून आघाडीबाबत मोठे वक्तव्य आले आहे. पार्टीने घोषणा केली आहे की, आगामी निवडणुकीत एआयएडीएमके आणि भाजपा एकत्र असतील. तमिळनाडुचे डेप्युटी सीएम ओ पन्नीरसेल्वम यांनी शनिवारी ही घोषणा केली.

गृहमंत्री अमित शाह यांच्या दौर्‍यासाठी आयोजित कार्यक्रमात पन्नीरसेल्वम यांनी म्हटले, ऑल इंडिया अन्ना द्रविड मुन्नेत्र कळघम आणि भारतीय जनता पार्टी आगामी विधानसभा निवडणुक एकत्र लढतील. तमिळनाडुत विधानसभा निवडणूक पुढील वर्षी एप्रिल-मेमध्ये होऊ शकते. आपल्या दोन दिवसीय दौर्‍यावर शाह भाजपाचे प्रमुख पदाधिकारी आणि जिल्हास्तरीय अध्यक्षांसोबत महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतील.

वेत्रीवल यात्रेनंतर दुरावले होते संबंध

दोन्ही पक्षांमधील संबंधात वेत्रीवल यात्रेवरून तणाव आला होता. एकीकडे राज्य सरकारने कोविड-19चे प्रतिबंध लक्षात घेऊन यात्रेला परवानगी दिली नव्हती. तर, दूसरीकडे भाजपा कार्यकर्त्यांनी 6 नोव्हेंबरपासून यात्रा सुरू ठेवली आहे. शाह यांनी ट्विटद्वारे नागरिकांचे आभार मानले.

पलनीस्वामीच असतील सीएम पदाचा चेहरा

पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की, शाह यांच्या दौर्‍याच्या एक दिवस अगोदर शुक्रवारी एक विशेष मीटिंग आयोजित करण्यात आली होती. या मीटिंगमध्ये भारतीय जनता पार्टीने सीएम एडापड्डी पलनीस्वामी यांना विधानसभा निवडणुक 2021 साठी सीएम पदाचे उमेदवार मानले नव्हते. मात्र, मागील महिन्यात पन्नीरसेल्वम यांनी अधिकृतरित्या घोषणा केली होती की, पलनीस्वामी एआयएडीएमकेचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील.