राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यासाठी बनवलं ‘हे’ खास विमान, जाणून घ्या सुरक्षा यंत्रणेबाबत

पोलिसनामा ऑनलाईन, नवी दिल्ली, दि. 14 ऑगस्ट : विदेश प्रवासासाठी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यासाठी एक आत्याधुनिक विमान अमेरिकेत बनविलं आहे. ‘एअय इंडिया वन’ असं या खास विमानाचं नाव असल्याचं सांगितलं जात आहे. हे विमान लवकरच भारतात येणार आहे. ‘व्हीव्हीआयपी’च्या विदेश प्रवासासाठी या खास या विमानाची निर्मिती केलीय. अत्याधुनिक आणि सुरक्षेच्या दृष्टीने परिपूर्ण असे हे विमान आहे, असे वृत्त एका वृत्तसंस्थेनं दिलंय.

‘बोईंग 777 इआर’ या विमानाच्या सर्व चाचण्या अमेरिकेत झाल्यात आता भारतीय अधिकारी त्याची तपासणी करून ते विमान भारतात आणणार आहे. सध्या पंतप्रधान आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंसाठी जे विमान वापरलं जातंय ते जुनं झालंय.

त्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष वापरतात त्या ‘एअर फोर्स वन’च्या धर्तीवर भारतासाठीही बोइंगने हे विमान तयार केलंय. या विमानाची बांधणी आणि अंतर्गत सजावट खूप खास आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली या विमानाची अंतर्गत रचना केलीय.

आकाशातून व्हिडीओ आणि ऑडिओच्या माध्यमातून पंतप्रधान कुठेही संवाद साधता येईल, अशी सोय, सुविधा या विमानात आहे. पंतप्रधानांसाठी कार्यालय, बैठकांसाठी खोली तसेच इतर अधिकार्‍यांसाठी मोकळी जागा आणि राहण्याची स्वतंत्र सोय यात केलीय.

या विमानात खास सुरक्षा यंत्रणा बसविण्यात आलीय. तसेच हल्ल्यांपासून हे विमान संरक्षण करेल, असे सांगण्यात येत आहे. या विमानात एक मेडिकल कक्ष आहे. हे विमान सतत 17 तास प्रवास करू शकेल. केवळ भारतीय हवाई दलाचे पायलट्स हे विमान चालविणार आहेत.