‘लॉकडाऊन’मध्ये ऐश्वर्यानं व्यक्त केलं ‘दु:ख’ ! म्हणाली- ‘आता आपलेच पैसे मागण्याचीही लाज वाटत आहे’

पोलिसनामा ऑनलाइन –कोरोना व्हायरसमुळं जगभरातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला झटका बसला आहे. काही कलाकार देखील असे आहेत ज्यांना आता आर्थिक अडचण येत आहे आणि काहींचे तर केलेल्या कामांचे पैसेही रखडले आहेत. यापैकीच एक आहे एकता कपूरचा टीव्ही शो ये हैं चाहतें मध्ये निगेटीव्ह रोल करणारी अभिनेत्री ऐश्वर्या सखुजा. ऐश्वर्या सध्या खूप पेरशान आहे. सध्या तिला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना ऐश्वर्या म्हणाली, “सध्या काळात माझे सगळेच शो ऑफ एअर झाले आहेत. परंतु तसं पाहिलं तर ये हैं चाहतें ही मालिका सेप झोनमध्ये आहे.”टीव्हीच्या कलाकारांना नेहमीच तीन महिन्यांच्या गॅपनं त्यांची फी मिळत असते. अशात आपला पेचेक घेण्याबद्दल एश्वर्या म्हणते, “स्थिती अशी आहे की, जी कामं आम्ही केली आहेत त्याचे पैसे मागायलाही लाज वाटत आहे. कारण सध्या काळात प्रत्येकजण अडचणीत आहे.”

पुढे बोलताना ऐश्वर्या म्हणाली, “सध्या हे स्पष्ट नाही की, पुढे स्थिती काय असणार आहे. फी कट होईल की नाही. अॅक्टर्ससाठी कशा प्रकारे मार्केट ओपन होईल हेही माहिती नाही. सध्या सर्वकाही अनिश्चित आहे.” असंही तिनं सांगितलं.