ऐश्वर्या रॉयचा ‘तो’ सिनेमा जो कधी रिलीज झालाच नाही, ‘अनसीन’ व्हिडीओ सोशलवर व्हायरल ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूड स्टार ऐश्वर्या रॉय बच्चन जरी सध्या सिनेमांपासून दूर आहे तरीही सोशल मीडियावरून ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. लॉकडाऊनमध्ये आत ऐश्वर्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. खास बात अशी की असंही सांगितलं जात आहे की, हा व्हिडीओ ऐश्वर्याच्या त्या सिनेमातील आहे जो कधी रिलीज झालाच नाही.

ऐश्वर्याचा एक व्हिडीओ इंस्टावरून शेअर करण्यात आला आहे जो सध्या सोशलवर पसरताना दिसतोय. लुकबद्दल बोलायचं झालं तर ऐश्वर्या एकदम ट्रॅडिशनल लुकमध्ये दिसत आहे. तिनं पर्पल कलरचा लहंगा घातला आहे. ऐश्वर्या व्हिडीओत डान्स स्टेप्स शिकत आहे. स्माईल करणारी ऐश्वर्या खूपच सुंदर दिसत आहे.

रिपोर्टनुसार हा व्हिडीओ 1997 साली शुट करण्यात आलेल्या राधेश्याम सीताराम या सिनेमाचा आहे. खरं तर हा सिनेमा कधी रिलीज झाला नाही. या सिनेमात ऐश्वर्या सोबत सुनील शेट्टी होता. परेश रावलही या सिनेमात प्रमुख भूमिकेत होते. हा सिनेमा पूर्ण झालाही नाही आणि बंद करावा लागला होता.

https://www.instagram.com/p/By5P19Shp7Z/

हा व्हिडीओ ऐश्वर्याचा आहे आणि त्यातही अशा सिनेमातील आहे जो रिलीज झालाच नाही त्यामुळं चाहत्यांची उत्सुकता आणखीच वाढली आहे. सध्या हा व्हिडीओ झपाट्यानं व्हायरल होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B0_FnqJp7CF/

https://www.instagram.com/p/B-WtK8aBLw4/

https://www.instagram.com/p/B-KeE8kh53y/

https://www.instagram.com/p/B9zLKiihrPk/

https://www.instagram.com/p/B7bZbRaFzdS/

https://www.instagram.com/p/B7V8KQ9FR1L/