‘छपाक’हून जास्त ‘तगडं’ कलेक्शन केलं ‘तान्हाजी’नं बॉक्स ऑफिसवर, ओपनिंगलाच ‘एवढ्या’ कोटींची केली कमाई

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अजय देवगण, सैफ अली खान आणि काजोल स्टार सिनेमा ‘तान्हाजीः द अनसंग वॉरियर’ आणि दीपिका पादुकोण स्टार ‘छपाक’ रुपेरी पडद्यावर एकाच दिवशी रसिकांच्या भेटीला आले. दोन्ही चित्रपटांनी आत्तापर्यंत चांगली कमाई केली असली तरी तान्हाजी चित्रपटाने कमाई बाबतीत छपाकला मागे टाकले आहे.

https://www.instagram.com/p/B7ILRKdpsiN/?utm_source=ig_embed

सध्या दोन्ही चित्रपटांची चर्चा रंगली आहे मात्र दीपिकाचे जेएनयूमध्ये जाणे चाहत्यांना खटकले असल्याचे चित्र दिसत आहे. याचाच परिणाम कदाचित चित्रपटावर झाला असावा असा अंदाज लावला जात आहे. त्यामुळे चित्रपटाची कथा दमदार असून चाहत्यांनी छपाककडे पाठ फिरवली असेल. ‘छपाक’ ला भारतात 1700 तर परदेशात 460 एकूण 2160 स्क्रिन मिळाले असून चित्रपट बॉक्स ऑफिसवर तान्हाजी इतका कमाई करु शकला नाही. तसेच ‘राजस्थान’, ‘मध्य प्रदेश’, ‘छत्तीसगढ़’ आणि इतर ठिकाणी हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. आगामी काळात त्याच्या कलेक्शनमध्येही वाढ होणार असल्याची चिन्ह आहेत.

https://www.instagram.com/p/B7AUujogr1Z/

‘तान्हाजी’ प्रदर्शित होताच या चित्रपटाने धुमाकूळ घातल्याचे पहायला मिळाले. या चित्रपटाने 16 कोटीची कमाई करुन दमदार ओपनिंग केली आहे. त्यामुळे आगामी दिवसात हा चित्रपट बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड तोडणार असल्याचे दिसत आहे. ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ सिनेमामुळे पुन्हा अजयची जादू चाहत्यांवर झाली असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

https://www.instagram.com/p/B6HrUEXpMfr/

https://www.instagram.com/p/B7EACupp0oj/

 

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/