‘हा नवा भारत.. घरातच नव्हे बाहेरही घुसून मारू’, अजित डोवाल यांचं वक्तव्य

ऋषिकेश : वृत्तसंस्था – रक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीन आणि पाकिस्तानला इशारा दिला आहे. चीनसोबत वास्तविक नियंत्रण रेषा (LAC) तणावादरम्यान डोवाल यांनी विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर एका सभेला संबोधित केलं.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेशच्या परमार्थ आश्रमात बोलताना अजित डोवाल म्हणाले, “भारताने कधी सुद्धा कोणावर आक्रमण केले नाही. मात्र, नव्या रणनीतीनुसार सुरक्षा धोके कमी करण्यासाठी कदाचित आपल्याला पहिली कारवाई करायला हवी होती. हे गरजेचं नाही की आम्ही तिथे लढू जिथे तुमची इच्छा आहे. भारत युद्धास तिथे घेऊन जाईल जिथून धोक्याची सुरुवात होते,” असे म्हणत ही ‘भारताची नवी विचारधारा असल्याचे सांगितलं आहे.

“आम्ही कधी देखील आमच्या स्वार्था साठी युद्ध केलं नाही. आम्ही युद्ध तर करणार. आपल्या जमिनीवरही आणि बाहेरही करु. पण आपल्या वैयक्तिक स्वार्था साठी नाही तर परमार्थासाठी करु…’ असे मतही अजित डोवाल यांनी व्यक्त केलं. दरम्यान, डोवाल यांनी हा पाकिस्तान आणि चीनला दिलेला सज्जड दमच मानला जातोय.