Ajit Pawar | नवाब मलिकांसंदर्भातील फडणवीसांच्या पत्रावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले – ”त्या पत्राचे काय करायचे ते…”

नागपूर : राष्ट्रवादीचे (NCP) वादग्रस्त नेते नवाब मलिक (Nawab Malik) हे अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून सभागृहात सत्ताधारी बाकावर काल उपस्थित राहिल्याने राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ सुरू झाला आहे. भाजपाने (BJP) मलिक यांच्यावर देशद्रोहासारखा गंभीर आरोप केला आहे. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवारांना पत्र पाठवून नवाब मलिक यांच्या सत्तेतील समावेशावर नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे फडणवीसांनी हे पत्र ट्विटरवरही पोस्ट केले. त्यावर अजित पवारांनी (Ajit Pawar) आज प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार यांनी म्हटले की, नवाब मलिक कालच सभागृहात आले होते. ते कुठे बसले हे टीव्हीवाल्यांनीच दाखवले आहे. यात स्वत: नवाब मलिकांची भूमिका अद्याप आलेली नाही. आम्ही महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिल्यांदाच ते सभागृहात आले. त्यांची भूमिका काय आहे हे पाहावे लागेल. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. त्यांची भूमिका ऐकल्यानंतर मी माझी प्रतिक्रिया देईन. यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांचे पत्र मला मिळाले. मी ते वाचले आहे.

अजित पवार (Ajit Pawar) पुढे म्हणाले, कुणी कुठे बसावे हे ठरवण्याचा अधिकार माझा नाही, तो विधानसभा अध्यक्षांचा
(Assembly Speaker) अधिकार आहे. इतर कोण काय म्हणाले हे मला माहिती नाही. नवाब मलिकांनी त्यांची भूमिका
स्पष्ट केल्यानंतर मी माझी भूमिका मांडणार. त्या पत्राचे काय करायचे ते माझे मी बघेन.
त्याबद्दल मीडियाला काही सांगण्याचे कारण नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

मुंबई-ठाण्यात 24 घरफोडी, पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्याच घरफोडीच्या गुन्ह्यात अटक

Pune Pimpri Chinchwad Crime News | मुंबई-ठाण्यात 24 घरफोडी, पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्याच घरफोडीच्या गुन्ह्यात अटक

Disha Patani Gorgeous Look | इवेंटमध्ये दिशा पटानीने वेधलं नेटकऱ्यांच लक्ष, पाहा व्हायरल फोटो…!