Ajit Pawar | ‘जलतरण तलाव आणि खेळाची मैदाने सुरू करा’ – अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | कोरोना संसर्गाच्या (Coronavirus) आढावा बैठकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज (शनिवारी) पुण्यात आले होते. कोरोनाच्या आढावा बैठकीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. पुणे शहर आणि जिल्ह्यातील (Pune News) खेळाडूंची गैरसोय टाळण्यासाठी खेळाची मैदाने (Play Grounds in Pune) आणि खेळाडू व कोरोना लसीचे 2 डोस घेतलेल्यांसाठी जलतरण तलाव (Swimming Pool in Pune) सुरू करावेत, असा आदेश अजित पवार यांनी दिला आहे.

 

त्यावेळी बोलतांना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, ”खेळाडूंसाठी खेळाची मैदाने आणि जलतरण तलाव सुरू करणे गरजेचे आहे. जलतरण तलाव खेळाडू बरोबरच कोरोना लसीचे 2 डोस घेतलेल्यांसाठीही खुली केली पाहिजेत. त्यामुळे ती तातडीने सुरू करा. मात्र खेळाडूंनी सुद्धा कोरोना लसीचे 2 डोस घेतलेले असले पाहिजेत. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात याव्यात. असंही ते म्हणाले.

पुढे अजित पवार म्हणाले, ”भीमाशंकर देवस्थानच्या ठिकाणी नागरिकांना दर्शनाची अनुमती द्यावी.
लेण्याद्री देवस्थानाबाबतही लवकरच निर्णय घेण्यात यावा.
पर्यटनस्थळांच्या ठिकाणी छोट्या व्यावसायिकांना त्यांचे व्यवसाय सुरू करण्याची मुभा द्यावी.”

 

यावेळी कोरोना आढावा बैठकीस विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे (Dr Neelam Gorhe), खासदार वंदना चव्हाण (MP Vandana Chavan), पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol), पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ढोरे (Mayor Usha Dhore), जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे (ZP President Nirmala Panas), विभागीय आयुक्त सौरभ राव (Divisional Commissioner Saurabh Rao), जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh), मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद (CEO Ayush Prasad) आदी उपस्थित होते.

 

Web Title :- Ajit Pawar | corona two mandatory start swimming pool and playground on the orders of ajit pawar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा