Ajit Pawar | सण-उत्सव साधेपणाने साजरा करावेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Ajit Pawar | कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी संकट अजून टळले नाही. त्यामुळे कोणीही गाफील राहू नये. येणाऱ्या काळात दहीहंडी, गणेशोत्सवाबरोबरच सर्वधर्मीयांचे महत्त्वाचे सण-उत्सव साधेपणाने साजरे करावेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. दरम्यान, येत्या काही दिवसात शाळा सुरु करण्याचा सरकार विचार करत असून त्या दृष्टीने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, जिल्ह्याला बाधित रुग्णांचा दर ३.१ टक्क्यापर्यंत कमी झाला असून पुणे शहर २.८ टक्के, पिंपरी चिंचवड २.९ टक्के आणि पुणे ग्रामीणचा ३.६ टक्के होता. नीती आयोगाने तिसऱ्या लाटेचे संकेत दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर लहान मुलांकरिता बेड्सचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच लसीकरणालाही प्राधान्य देण्यात येणार असून जास्तीत जास्त लस उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्यांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहे. त्यातील ०.१६ टक्के नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी.

कोरोनाचा सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. एसटी महामंडळाचे उत्पन्नही कोरोना काळात घटले होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन थकले असल्याने पहिल्या टप्प्यात परिवहन विभागाला पाचशे कोटी रुपये देण्यात आले आहेत. तर दुसऱ्या टप्प्यातही वेतनासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार असून राज्याच्या तिजोरीतून हा निधी देण्यात येणार आहे, असेही पवार यांनी सांगितले. या वेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (dr neelam gorhe) , खासदार वंदना चव्हाण (MP Vandana Chavan) यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींनी महत्त्वाच्या सूचना केल्या.

 

गणेशोत्सवाबाबत अहवाल प्राप्त झाल्यानंतर निर्णय

गणेशोत्सवाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, पुणे (Pune), सातारा (Satara),
सांगली (Sangli), सोलापूर (Solapur) आणि कोल्हापूर (Kolhapur)
जिल्ह्यातील कोरोना संसर्गाबाबत स्वतंत्र अहवाल तयार करण्यात येणार आहे.
हा अहवाल विभागीय स्तरावरून राज्य सरकारकडे पाठवावा,
अशा सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव (Divisional Commissioner Saurabh Rao)
आणि विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया (Special Inspector General of Police Manoj Lohia) यांना दिल्या आहेत.
त्यानंतरच गणेशोत्सवाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title : Ajit Pawar | Festivals including ganeshotsav should be celebrated simply

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update