Ajit Pawar Group | अजित पवार गट आणखी होणार मजबूत! एका आमदार व एका खासदारांनी दिले पाठिंबा असल्याचे प्रतिज्ञापत्र

पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीमध्ये (NCP) अजित पवारांनी बंड पुकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील दोन गट पडले आहेत. शरद पवार गट (Sharad Pawar Group) व अजित पवार गट (Ajit Pawar Group) यांच्यामधील समेट करण्याची वेळ आता निघून गेली असून दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अजित पवार गटाने पक्षावर दावा केला असून चिन्ह व राष्ट्रवादी पक्ष आमचाच असल्याचे सांगितले आहे. तसेच विधीमंडळ अध्यक्षांकडे शरद पवार गटातील आमदारांनी पक्ष विरोधी कृत्य केल्यामुळे या आमदारांना अपात्र करण्यात यावे अशी याचिका दाखल केली आहे. या गटातील वाद आता निवडणूक आयोगासमोर (Election Commission) सुरु होणार असून येत्या ऑक्टोबर महिन्यापासून या सुनावणीला सुरुवात होणार आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या गटातील एक आमदार व एक खासदार अजित पवार गटाकडे (Ajit Pawar Group) जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगल्या आहेत. या दोन बड्या नेत्यांनी अजित पवार गटाला प्रतिज्ञापत्र दिले असल्याचे देखील बोलले जात आहे.

अजित पवार गट व शरद पवार गट यांच्यामधील संघर्ष वाढला असून दोन्ही गट एकमेकांवर ताशेरे ओढत आहेत. हा संघर्ष लवकरच निवडणूक आयोगासमोर सुरु होणार आहे. त्यापूर्वी दोन्ही गट राज्यामध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करत असून आपापल्या पक्षाची बांधणी मजबुत करण्याच्या प्रयत्नामध्य़े असल्याचे दिसून येत आहे. मात्र यामध्ये शरद पवार गटाची ताकद कमी होण्याची शक्यता आहे. कारण एक खासदार व एक आमदार हे अजित पवार गटामध्ये लवकरच सामील होणार असल्याचे बोलले जात आहे. या दोन्ही नेत्यांनी समर्थनाचे प्रतिज्ञापत्र अजित पवार गटाला दिले असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

शरद पवारांना लोकसभेतील अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि श्रीनिवास पाटील (Srinivas Patil) या खासदारांचा
पाठिंबा आहे तर राज्यसभेतील वंदना चव्हाण (Vandana Chavan) आणि फौजिया खान (Fauzia Khan) या
खासदारांचा पाठिंबा आहे. या चार खासदारांपैकी कोण अजित पवार गटाकडे गेले आहे याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
अजित पवारांच्या शपथविधी सोहळ्यास खासदार अमोल कोल्हे उपस्थित होते. मात्र नंतर त्यांनी शरद पवारांची साथ दिली.
तसेच राज्यातील एक आमदार देखील अजित पवार गटामध्ये (Ajit Pawar Group) सामील होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र हे आमदार व खासदार कोण असतील याबाबत अद्याप नावे समोर आलेली नाहीत. अजित पवार गटाचा मुळ राष्ट्रवादी पक्ष म्हणून तेच असल्याचा दावा आहे. त्यामुळे शरद पवार गटाच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी अशी याचिका देखील अजित पवार गटाने केली आहे.

यावरुन शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी अजित पवार गटावर सडकून टिका केली आहे.
रोहित पवार गंभीर आरोप करत म्हणाले की, “आमदारांवर व खासदारांवर दबावतंत्र वापरुन काही नेत्यांचं ब्लॅकमेलिंग
सुरू आहे. तू सही कर नाहीतर अमुक अमुक काम होणार नाही असं कदाचित सांगितलं जात आहे.
काल विधानसभा अध्यक्ष दिल्लीला कायदेशीर सल्ला घेण्यासाठी गेले होते. तिथूनच त्यांनी अजित पवार गटाला फोन
केला असेल आणि त्यानंतर अपात्रतेची कारवाई करण्यात आली असेल.” असा आरोप देखील रोहित पवार यांनी
अजित पवार गटावर केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit Pawar On Ajit Pawar Group | आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप; म्हणाले – ‘अजित पवार गटाकडून नेत्यांचं ब्लॅकमेलिंग सुरू, सही कर नाहीतर…’