Ajit Pawar Group | पिंपरी-चिंचवडमध्ये अजितदादांना धक्का, माजी महापौर ठाकरे गटाच्या वाटेवर?

पिंपरी : Ajit Pawar Group | पिंपरी-चिंचवड शहराचे माजी महापौर संजोग वाघेरे हे शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena Thackeray Group) वाटेवर असल्याचे वृत्त आहे. आज अजित पवार (Ajit Pawar) हे पिंपरी-चिंचवडमध्ये असतानाच ही बातमी येऊन धडकली आहे. अजित पवार गटाला (Ajit Pawar Group) हा मोठा धक्का मानला जात आहे. संजोग वाघेरे (Ncp Former Mayor Sanjog Waghere) यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

संजोग वाघेरे यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut), राज्य संघटक एकनाथ पवार, ठाकरे गटाचे शहरप्रमुख सचिन भोसले, जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार, योगेश बाबर उपस्थित होते.

संजोग वाघेरे हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) वजनदार स्थानिक नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर संजोग वाघेरे हे अजित पवार गटासोबत गेले. मात्र, आज अचानक त्यांनी मातोश्रीवर भेट दिल्याने अजित पवार गटाला धक्का बसला आहे. संजोग वाघेरे हे मावळमधून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. (Ajit Pawar Group)

संजोग वाघेरे यांनी मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी मावळमधून लढण्यासाठी पूर्ण तयारी केली होती.
पण अचानक अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी दिली गेल्याने त्यांना माघार घ्यावी लागली होती.
या निवडणुकीत पार्थ पवार यांचा पराभव झाला होता.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सर्वच ठिकाणच्या स्थानिक पातळीवरील राजकीय स्थितीवर
मोठा परिणाम झाला आहे. उमेदवारी मिळण्याची शाश्वती वाटत नसल्याने अनेक उमेदवार आतापासूनच उमेदवारीचा
पर्यायी मार्ग शोधू लागले आहेत.

अशाच प्रकारे मावळची जागा महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला
जाण्याची शक्यता असल्याने वाघेरे यांनी ठाकरे गटाकडे मोर्चा वळवल्याचे बोलले जात आहे.
वाघेरे यांना ठाकरे गटाकडून मावळमधून उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit Pawar | ”टप्प्याटप्प्याने अजित पवारांची ताकद कमी करण्याचा भाजपाचा प्रयत्न, आता…”, रोहित पवारांचे वक्तव्य

Sharad Pawar | शरद पवारांनी परखड शब्दात अजित पवारांना सुनावले, ”माझे बंड यांच्यासारखे…”

Pune Pimpri Chinchwad Crime News | प्रियकराचा लग्नास नकार, प्रेयसीची गळफास घेऊन आत्महत्या; तळेगाव दाभाडे येथील घटना

Ashish Shelar | आशिष शेलारांचा शिवसेनेवर पलटवार, ”गांजा, चिलीम ओढून अग्रलेख लिहिणारे, भोंदूगिरी करून…”