Ajit Pawar In Maharashtra Budget Session | राष्ट्रीय नेत्याच्या प्रतिमेला जोडे मारणे योग्य नाही, कारवाई करा, अजित पवारांची मागणी; तर आमच्याकडेसुद्धा पायताणं आहेत, बाळासाहेब थोरातांचा सरकारला इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar In Maharashtra Budget Session | मुंबईत सुरु असलेल्या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. दोन दिवसांपूर्वी विधीमंडळ परिसरात राहुल गांधींच्या (Congress Leader Rahul Gandhi) प्रतिमेला जोडे मारण्यात आले. यावरून आज विधिमंडळात गोंधळ झाला. ज्यांनी अशी कृती केली त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. राष्ट्रीय नेत्याच्या प्रतिमेला असे जोडे मारणे योग्य नसल्याचे अजित पवार म्हणाले. तर आमच्याकडेसुद्धा पायताणं आहेत हे विसरुन चालणार नाही, असा इशारा बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सरकारला दिला. (Ajit Pawar In Maharashtra Budget Session)

अजित पवार म्हणाले, विरोधी पक्ष म्हणून महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) जनतेचे प्रश्न मांडले. पण दोन दिवसांपूर्वी विधीमंडळ परिसरात राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. वेगवेगळी मते असू शकतात. भूमिका असू शकतात. मात्र महाराष्ट्राची एक वेगळी परंपरा संस्कृती आहे. ज्या सभागृहात यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांच्यापासून अनेक दिग्गजांनी नेतृत्व केलं आहे. त्यांचा पुतळा ज्या परिसरात आहे, त्याच परिसरात जोडे मारण्याचे काम केल्याचे अजित पवार यांनी म्हटले. याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. याबाबत आम्ही विधानसभा अध्यक्षांची (Assembly Speaker) भेट घेतली. अशी घटना कोणत्याही राष्ट्रीय नेत्यांच्या बाबती घडू नये असे सांगितले. असं जर कोणी केलं तर त्यांना निलंबीत केले पाहिजे, अशी भूमिका आमची आहे. त्यामुळे यासंदर्भात निर्णय घ्यावा अशी विनंती अध्यक्षांना केल्याचे अजित पवार यांनी सांगितले. (Ajit Pawar In Maharashtra Budget Session)

तोंडाला काळ्यापट्ट्या लावून विरोधकांचे आंदोलन

केंद्र सरकारच्या (Central Government) निषेधार्थ विरोधकांनी आज तोंडाला काळ्यापट्ट्या लावून विधान भवन परिसरात आंदोलन केले. विरोधकांची मुस्कटदाबी होतेय, देशात हुकूमशाही असल्याचा आरोप करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. तसेच विधानसभेतही आज विरोधकांनी सभात्याग केला. यानंतर विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

Advt.

आमच्याकडेसुद्धा पायताणं आहेत…

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सरकारला खडे बोल सुनावताना म्हणाले,
आमचे राष्ट्रीय नेते राहुल गांधींची अवहेलना करणारी घोषणा आणि कृती चालली होती.
ती अत्यंत निषेधार्ह अशा प्रकराची आहे. आज आमचे राष्ट्रीय नेते आहेत, उद्या त्यांच्याकडेही राष्ट्रीय नेते आहेत.
आज आमच्याकडेसुद्धा पायताणं आहेत हे विसरुन चालणार नाही, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.
तसेच या सगळ्या गोष्टींचा विचार करता अध्यक्षांनी कडक कारवाई करावी अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली.

Web Title :- Ajit Pawar In Maharashtra Budget Session | take action against those protest against congress leader rahul gandhi in the legislature premises demand opposition leaders ajit pawar balasaheb thorat

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Parbhani News | परभणीचे खासदार संजय जाधव यांना दुसऱ्यांदा जिवे मारण्याची धमकी; राजकीय क्षेत्रात उडाली खळबळ

BJP MLA Nitesh Rane | राहुल गांधीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन पाकिस्तानात हकलून द्या, आमदार नितेश राणेंचा घणाघात