Ajit Pawar | ‘एकच वादा अजित दादा’ ! पुण्यात उद्घाटनांचा धुमधडाका, एकाच दिवशी 19 कार्यक्रम अन् 27 उद्घाटन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महापालिकेची Pune Municipal Corporation (PMC) मुदत संपण्यास अवघे पाच दिवस बाकी असल्याने नगरसेवकांनी (PMC Corporator) त्यांच्या विकास कामांच्या (Development Work) उद्घाटनाचा धडाका लावला आहे. शनिवारी आणि रविवारी शहरात सुमारे 50 कार्यक्रम होणार आहेत. विशेष म्हणजे पुण्याचे पालकमंत्री (Pune Guardian Minister) अजित पवार (Ajit Pawar) हे एकाच दिवशी तब्बल 19 कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचेही कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. अजित पवार (Ajit Pawar) 12 तासात 19 कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

 

राज्यातील महापालिकांच्या निवडणूका लांबवणीवर (Municipal Election Postponed) पडल्याने विद्यमान नगरसेवक 15 मार्च पासून माजी नगरसेवक होणार आहेत. महापालिकेची निवडणूक एप्रिल – मे महिन्यात होणार की पावसाळा संपल्यावर दिवाळीत होणार याबाबत अद्याप कोणतीच स्पष्टता नाही. याशिवाय राज्य सरकारने (Maharashtra Government) मंजुर केलेल्या विधेयकामुळे (Bill) प्रभाग रचनेत देखील बदल होणार असल्याची चर्चा आहे. यामुळे विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत. असे असताना विद्यमान नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका लावला आहे.

 

या कामांचे होणार उद्घाटन
उद्यान, खेळाचे मैदान, प्रसुतीगृह, अग्निशामक केंद्र, अभ्यासिका, बहुद्देशीय हॉल, रस्त्यांचा शुभारंभ, उड्डाणपुलाचा शुभारंभ अशा विविध विकास कामांचे उद्घाटन आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्याच्या हस्ते करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. नेत्यांच्या तारखा मिळाल्या नसल्याने या कामांचे उद्घाटन लांबणीवर पडले आहे.

 

कर्वे रस्त्याच्या उड्डाणपुलाचे उद्घाटन
शनिवार आणि रविवार या दिवशी विधीमंडळाच्या अधिवेशनाला सुट्टी आहे. त्यामुळे राज्यातील नेत्यांकडून विकासकामांच्या उद्घाटनासाठी नगरसेवकांना वेळ दिली आहे. रविवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कर्वे रस्त्याच्या उड्डाणपुलाचे (Karve Road Flyover) उद्घाटन करणार आहेत. तर चंद्रकांत पाटील हे 7 कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. या दोन नेत्यांच्या कार्यक्रमात वाढ होण्याची शक्यता भाजपकडून वर्तवण्यात आली आहे.

 

अजित पवार 19 कार्यक्रमांना हजर राहणार

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी रविवारी (दि.13) राष्ट्रवादीच्या (NCP) नगरसेवकांसाठी पूर्ण दिवस दिला आहे.
सकाळी 6 वाजता बाणेर येथे पहिला कार्यक्रम होणार आहे.
त्यानंतर वारजे, भारती विद्यापीठ, कात्रज, धनकवडी, बालाजीनगर, कोंढवा, वानवडी, हडपसर, वडगाव शेरी मतदारसंघात शेवटचा कार्यक्रम 7 वाजता होणार आहे.
दिवसभरात 19 ठिकाणी कार्यक्रम घेवून 27 उद्घाटने अजित पवार करणार आहेत.

 

Web Title :- Ajit Pawar | inaguration program in pune by ajit pawar pune politics news ncp

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा