Ajit Pawar | … अन्यथा राज्यात पुन्हा निर्बंध, अजित पवारांचा राज्यातील जनतेला थेट इशारा (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  ग्रामीण भागामध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या (corona patient) संख्येत वाढ होत असल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी चिंता व्यक्त केली आहे. पुणे (Pune) दौऱ्यावर असणाऱ्या अजित पवार यांना ग्रामीण भागात रुग्ण वाढत आहेत असा प्रश्न विचारला. यावर बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. ते म्हणाले की ग्रामीण भागात लोकांच्या मनात कोरोनाची भिती राहीलेली नाही. अनेक लोक मास्क वापरत नाहीत. नियम पाळले जात नाहीत. याबाबत मुख्यमंत्र्यांनी (CM) आवाहन करुन देखील काहीजण सार्वजनिक सण, उत्सव साजरे करुन राजकारण करीत आहेत. हे कुठेतरी थांबले पाहिजे. पुन्हा कोरोनाची तिसरी लाट (corona third wave) आल्यास येरे माझ्या मागल्या करुन सर्वच बंद करण्याची वेळ राज्य सरकार आणि प्रशासनावर आणू नये असा थेट इशारा अजित पवार यांनी राज्यातील जनतेला दिला आहे.

आज पुण्यामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारच्या परिषद अध्यक्ष पदाचा पदभार विद्याधर अनास्कर (Vidyadhar Anaskar) यांनी स्विकारला. त्यावेळी अजित पवार जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) उपस्थित होते. यावेळी त्यांनी सहकार चळवळ सक्षम करण्यासाठी सहकार कायद्यामध्ये जे जे बदल आवश्यक आहेत त्याची शिफारस परिषदेने तात्काळ करावी. सहकार परिषदेसाठी राज्य सरकारकडून जे काही अपेक्षीत आहे तेही सादर करण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या आहेत.

 

मंदिराबाबत विरोधकांचा भावनिक मुद्दा

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local body elections) डोळ्यासमोर ठेवून विरोधकांकडून मंदिरे सुरु करण्याचा भावनिक मुद्दा पुढे करण्यात असल्याची टीका पवार यांनी केली.
भाजप (BJP) आणि मनसे (MNS) राज्यात मंदिरे सुरु करण्याबाबत आक्रमक झाली आहे.
यासंदर्भात पवार म्हणाले, कोणी किती आक्रमक व्हावे, हा त्यांचा प्रश्न आहे.
येत्या काही महिन्यांत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत.
त्यामुळे स्वत:चे अस्तित्व दाखविण्यासठी प्रत्येक जण प्रयत्न करणार आहे.
सध्या मंदिरे सुरु करण्याचा भावनिक मुद्दा उपस्थित करुन काही साध्य करता येईल का,
याचा प्रयत्न विरोधक करत आसल्याचे पवार यांनी म्हटले.

शाळा सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील

देखील काही राज्यांमध्ये शाळा सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्रातील शाळा कधी सुरु होणार यावर बोलताना अजित पवार म्हणाले, कोरोनामुळे सध्या दिवाळीनंतर शाळा सुरु कराव्यात, असा एक मतप्रवाह आहे.
तर पॉझिटिव्ह रुग्णदर शून्यावर आल्यानंतरच शाळा सुरु कराव्यात असा दुसरा मतप्रवाह आहे.
याबाबत टास्क फोर्सच्या तज्ज्ञांशी (task force experts) चर्चा करुन शाळा नक्की कधी सुरु करायच्या याबाबत अंतिम निर्णय घेतील असे अजित पवार यांनी सांगितले.

 

Web Title : Ajit Pawar | ncp ajit pawar warns about coronavirus lockdown

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Shivsena | पुणे जिल्हा संपर्कप्रमुखपदी सचिन अहिर, सहसंपर्कप्रमुखपदी आदित्य शिरोडकर

LIC Kanyadaan policy | जर तुम्ही ‘या’ योजनेत जमा केले 130 रूपये तर मॅच्युरिटीनंतर मिळतील पूर्ण 27 लाख; जाणून घ्या कसे?

Pune Crime | बळजबरीने शारीरीक संबंध ठेवून दिला लग्नास नकार, कोथरुडमधील कुटुंबावर अनुसुचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा