Ajit Pawar | शरद पवारांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित का नव्हता? प्रश्न विचारताच अजित पवार पत्रकारावर भडकले, म्हणाले – ‘ए…’

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी मंगळवारी (2 मे) पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त (Resignation) होत असल्याची घोषणा केली. यानंतर दोन दिवस पक्षातून तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. त्यानंतर शरद पवार यांनी पक्षातील नेते, कार्यकर्ते यांच्या आग्रहास्तव निवृत्तीची घोषणा मागे घेत असल्याची घोषणा शुक्रवारी केली. यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र या पत्रकार परिषदेला अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित नव्हते. यावरुन ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पुन्हा सुरु झाली. यावर प्रश्न विचारताच अजित पवार (Ajit Pawar) पत्रकारावर भडकल्याचे पाहायला मिळाले. ते बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

 

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्यावर सर्वांनी समाधान व्यक्त केले. मी स्वत: ट्वीट करत प्रेसनोट काढली आहे. कालच शरद पवार यांनी सांगितले, माझा आणि पत्रकारांचा जास्त संबंध येत नाही, कारण मी कामाचा माणूस आहे.

 

कायमच तुमच्याबद्दल संभ्रमाचे वातावरण का निर्माण केले जाते? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, ते तुम्ही प्रश्न विचारता, म्हणून संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जाते. आमच्यावर अतिशय प्रेम करणारे जे लोक आहेत, ते माझ्याबद्दल संभ्रमाचे वातावरण तयार करतात, असे मिश्किल उत्तर त्यांनी दिले.

 

शरद पवारांच्या पत्रकार परिषदेला अनुपस्थित का होता? असा प्रश्न विचारताच ते पत्रकारावर भडकले. ए… त्याबद्दल शरद पवार यांनी सांगितले आहे ना.. पुन्हा, पुन्हा काय रे तेच ते… प्रफुल्ल पटेल (Praful Patel), प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (State President Jayant Patil), पी.सी. चाको (P.C. Chako) आणि केरळचे आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते.
तसेच पत्रकार परिषदेत चार ते पाच खुर्च्या असतात.
त्यामुळे शरद पवारांनी येऊ नका सांगितलं होतं, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं.

 

मी त्यांच्या वॉचवर नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे कर्नाटकात प्रचारासाठी गेले आहेत.
याबाबत अजित पवार यांना विचारले असता, मुख्यमंत्री कुठे गेले मला काय करायचं? मुख्यमंत्री कुठे गेले मी त्यांच्या वॉचवर नाही.
तुम्ही माझ्या वॉचवर आहात तसं मी नाही. मला माझी कामे आहेत. मी ते करत आहे, असंही अजित पवारांनी सांगितलं.

 

Web Title :- Ajit Pawar | NCP leader ajit pawar clarification why not attend sharad pawar press conferencer in back retirement ncp chief post

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sasubai Jorat Marathi Movie | मल्टीस्टारर धमाल कॉमेडी “सासूबाई जोरात’२६ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : सहकारनगर पोलिस स्टेशन – वर्षभरापासुन फरारी असलेल्या आरोपीला अटक

Railway Summer Special Trains For Konkan | Pune : या उन्हाळी सुट्टीत करा कोकण वारी; मध्य रेल्वच्या कोकणासाठी विशेष गाड्या