Ajit Pawar | अजित पवार सत्ताधारी आमदारावर भडकले; म्हणाले – ‘अरे थांब ना बाबा.. आम्ही काय गोट्या खेळायला आलोय का?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रचं पावसाळी अधिवेशन (Maharashtra Monsoon Session) सुरु असून सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे सभागृहात आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे निधी वाटपाच्या मुद्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना उद्देशून बोलत असताना खाली बसून बोलणाऱ्या आमदारांवर अजित पवार (Ajit Pawar) चांगलेत भडकल्याचे पहायला मिळाले. यावेळी त्यांनी ‘अरे थांब ना बाब, तुलाच फारय कळतंय का? आम्ही इथं गोट्या खेळायला आलो आहे का?’ असा संतप्त सवाल त्यांनी केला.

 

अजित पवार (Ajit Pawar) हे महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government) काळातील 25/15 च्या निधी वाटपासंदर्भात सांगत होते. महाविकास आघाडीमध्ये 25/15 मध्ये मविअच्या आमदारांना (MLA) 5 कोटीच्या निधीचे वाटप करण्यात आले होते, ते मी कबुल करतो, असे अजित पवार म्हणाले. तर त्याचवेळी विरोधी पक्षातील आमदारांच्या याद्या घेऊन त्यांनाही 2 कोटी रुपये दिल्याची आठवण त्यांनी करुन दिली.

 

मात्र त्यांचे हे विधान ऐकूण सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
गोंधळ वाढत असतानाच अजित पवार म्हणाले, एक मिनीट, मघाशीच सांगितलं आहे की तुम्हाला जे बोलायचं आहे
ते नंतर उठून बोला. यानंतरही सत्ताधारी पक्षातून एक जण त्यांच्या भाषणात अडथळा आणत होता.
यावर संतापून अजित पवार म्हणाले, अरे थांब ना बाबा, तुलाच फार कळतयं का? आम्ही काय गोट्या खेळायला आलोय का? असे ते म्हणाले.

 

Web Title :- Ajit Pawar | ncp leader ajit pawar get angry in assembly session while speaking on fund mentioning bjp leader devendra fadnavis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | इंजिनिअर पतीवर काळी जादू केल्याप्रकरणी उच्चशिक्षित पत्नीविरुद्ध फौजदारी गुन्हा

 

Vinayak Mete Accident | विनायक मेटेंना अपघातानंतर वेळेवर मदत का मिळाली नाही? फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती

 

CM Eknath Shinde | ‘देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंवर प्रेम, दया, ‘करुणा’ दाखवली’ – एकनाथ शिंदे