आता अजित पवारांची पार्थसाठी मोर्चेबांधणी

पनवेल : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लोकसभेतून माघार घेतल्यानंतर आता पुढच्या पिढीला संधी दिली गेली पाहिजे असे त्यांनी संगितले. एवढेच नाही तर पार्थ पवार यांची मावळ मधून उमेदवारी देखील जवळपास निश्चित आहे. आज (बुधवारी) सकाळीच पार्थ पवार यांनी कार्ला गडावरील एकविरा देवीचे दर्शन घेऊन आपल्या भावी राजकीय वाटचालीसाठी आशीर्वाद देखील घेतले. त्यानंतर आता आपले सुपुत्र पार्थ पवार यांच्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अजित पवार यांनी पनवेलमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आढावा घेतला आहे. मावळ लोकसभा मतदार संघात पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड व मावळ विधानसभा मतदार संघ व रायगड जिल्ह्यातील कर्जत, उरण व पनवेल हे विधानसभा मतदार संघ येतात.

अजित पवार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून पनवेलमध्ये कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत असल्याचा फोटो आणि ट्विट पोस्ट केले आहे. “आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पनवेलच्या काँग्रेस भवनात आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. आता समविचारी पक्ष आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पुढल्या कामांना जोमानं सुरुवात केली पाहिजे, असा निर्धार केला”.अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

एकीकडे पार्थ पवार यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे , तर दुसरीकडे अजित पवारही कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन मुलासाठी जोर लावताना दिसत आहेत . मावळमधून राष्ट्रवादीचा दमदार उमेदवार नव्हता . या भागात पवार आणि राष्ट्रवादीचे वलय आहे. याचा फायदा या ठिकाणी पार्थ यांना होणार असल्याचे देखील बोलले जात आहे.

Loading...
You might also like