बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar On Gopichand Padalkar | भाजपचे आमदार (BJP MLA) गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसात राज्यभरात उमटताना दिसत आहेत. अजित पवार हे बारामती दौऱ्यावर असताना थेट त्यांच्यासमोरच याचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या विधानाचा निषेध करत त्यांना काळं फासण्याचा इशारा अजित पवारांसमोर दिला. तसचे रोहित पवारांच्या विरोधात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलेल्या विधानाचा देखील यावेळी निषेध करण्यात आला. (Ajit Pawar On Gopichand Padalkar)
उपमुख्यमंत्री अजित पवार आज (शनिवार) बारामती दौऱ्यावर असून सकाळी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कर्यकर्त्यांनी उठून अजित पवार यांच्याबाबत विधान करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांचा निषेध केला. अजित पवार यांच्याबाबत आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कुठेही आणि बारामतीमध्ये येऊन पडळकर यांनी वादग्रस्त विधान केले तर आम्ही त्यांच्या तोंडाला काळे फासू असा थेट इशारा अजित पवार यांच्यासमोर कार्यकर्त्यांनी दिला. (Ajit Pawar On Gopichand Padalkar)
अजित पवारांबाबत बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गोपीचंद पडळकर यांचा राजिनामा घ्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. कार्यकर्ते संतापल्याचे पाहून अजित पवार यांनी त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. तसेच सर्वसाधारण सभा असून लोकशाही मध्ये सर्वांना मते मांडण्याची संधी आहे, असे म्हणत सर्वसाधारण सभेत संबंधित प्रश्न विचारण्यात यावेत. प्रत्येकाने बोलत असताना भान ठेवून बोलावे, यात दुमत नाही असं पण सध्या वाचाळवीरांची संख्या वाढत आहे, अशा शेलक्या शब्दात अजित पवारांनी पडळकरांवर निशाणा साधला.
काय म्हणाले पडळकर?
गोपीचंद पडळकर म्हणाले, धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही.
म्हणून अजित पवार यांना पत्र देण्याची गरज नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत.
अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही.
त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो, अशा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिलं आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Maharashtra Police News | कर्तव्यावर असलेल्या पोलिसानं स्वत:वरच झाडली गोळी, पोलिस दलात प्रचंड खळबळ