Ajit Pawar on Pune Metro | पुण्यात गणेशोत्सवात मेट्रो रात्री 12 पर्यंत धावणार, अजित पवारांची माहिती (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar on Pune Metro | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज (सोमवार) पुणे दौऱ्यावर आहेत. आज सकाळी अजित पवार यांच्या हस्ते हडपसर येथे 106 फुटी ध्वजाचे (Flag) लोकार्पण करण्यात आले. यानंतर पोलीस मुख्यालय (Pune Police Headquarters) येथे पुण्यातील गणेशोत्सव मंडळांसोबत त्यांनी बैठक घेतली. यावेळी पुण्यात गणेशोत्सवात (Pune Ganesh Utsav 2023) मेट्रो रात्री 12 वाजेपर्यंत धावणार असल्याची माहिती त्यांनी दिली. (Ajit Pawar on Pune Metro)

अजित पवार म्हणाले, पुण्यातील गणेशोत्सव जगभरात प्रसिद्ध आहे. परदेशी लोक या उत्सवासाठी खास पुण्यात येत असतात. यंदाही गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे. बप्पांच्या दर्शनासाठी येणाऱ्या गणेश भक्तांची काळजी घेणयास पोलीस प्रशासन (Pune Police) सज्ज आहे. त्यप्रमाणे सूचना देण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले. (Ajit Pawar on Pune Metro)

पुण्यातील मिरवणुका (Pune Visarjan Miravnuk) हे एक गणेशोस्तवाचे वेगळेपण आहे. दरवर्षी या मिरवणुकांना वेळ लागतो. यासंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले, यंदा मिरवणुका वेळेत संपवण्यासाठी मंडळे प्रयत्न करणार आहेत. तसेच प्रशासनाच्या दृष्टीने मिरवणुकांबाबत योग्य ती पावले उचलली जात आहेत.

https://www.facebook.com/watch/?v=206672642391067

पुण्यात आठवड्याला बैठक घेण्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले,
मी बैठक घेतल्यावर मला वाटतं की त्याचे परिणाम सात दिवस राहतील. यामुळे दर आठवड्याला बैठक घेतो.
मात्र, काहींना वाटतं की त्यांच्या बैठकीचा परिणाम एक दोन महिने राहील म्हणून ते एक दोन महिन्यांनी बैठका घेतता.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
आणि मी खेळीमेळीत काम करत आहोत. काहींना माझी भूमिका पटते काहींना नाही पटत.
ज्यांना पटत नाही ते माझ्यावर टीका करतात, असे अजित पवार यांनी म्हटले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | लोणी काळभोर: तलवारीचा धाक दाखवून उभा चिरण्याची धमकी; खंडणी मागणार्‍या गुंडाला अटक

ACB Trap On Policeman | समन्स बजाविण्यासाठी लाचेची मागणी, पोलिस अंमलदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Chitra Wagh | ‘उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे फक्त थयथयाट’, चित्रा वाघ यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र (व्हिडीओ)