Ajit Pawar On Raj Thackeray | ‘अरे बाबा, भोंग्यावर भाषणं करणं सोपं आहे, पण..’ – अजित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar On Raj Thackeray | गुढीपाडवा दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीच्या भोंग्यांसमोर स्पीकर लावून हनुमान चालिसा वाजवा, असं भाष्य केलं. यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असल्याचं दिसतंय. यानंतर अनेक नेत्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. आता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.

शिर्डीच्या (Shirdi News) उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन आणि नुतन इमारत उद्घाटन कार्यक्रमात अजित पवार उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. ”चिथावणीखोर भाषण करू लोकांचे प्रश्न सुटणार आहेत का?” असा सवाल पवार यांनी विचारला आहे. ”अरे भाषण करणं सोपं आहे रे बाबा. पण आता त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक आम्हाला निवडून यायचं आहे आणि हे काय सांगताय… सांगू लागले आहेत. कोणाला तरी बरं वाटण्यासाठी, निवडणुकीवर डोळा ठेवून अशा प्रकारची भाषणं, वक्तव्यं करायची हे आपल्या शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्राला परडवणारं नाही.” असं अजित पवार म्हणाले. (Ajit Pawar On Raj Thackeray)

पुढे अजित पवार म्हणाले, ”काही लोक समाजात संभ्रमावस्था निर्माण करण्याचं काम करतात. कित्येत वर्ष लोक गुण्यागोविंदाने वर्षानुवर्षे एकमेकांना साथ देत आहेत, जातीय सलोखा ठेवला आहे, जातींमध्ये, धर्मात तेढ निर्माण होऊ देत नाही. पण काही पक्षाचे नेते इथं असं करा, इथं हा भोंगा लावा, तिथं हा भोंगा लावा सांगत आहेत.” असं ते म्हणाले.

Web Title :- Ajit Pawar On Raj Thackeray | ajit pawars criticized raj thackeray


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nia Sharma Killer Look | निया शर्मानं पायऱ्यांवर बसून दिल्या किलर पोज; नेटकरी म्हणाले – ‘कपड्यांपेक्षा शूज मोठे झालेत..’

PM Modi-Sharad Pawar Meeting | ED वर चर्चा ? पवार – मोदींच्या भेटीने राजकीय चर्चांणा उधाण !

Rashmika Mandanna Upcoming Movie | रश्मिका मंदानानं रणबीर कपूर सोबत केलेल्या ‘एनिमल’ चित्रपटावर दिली प्रतिक्रिया; म्हणाली – ‘खरच हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे..’