Ajit Pawar | ’50 खोक्यांचा आरोप खरा ठरतोय’, अजित पवारांचा घणाघात (व्हिडिओ)

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचा सध्याचा कारभार ढिसाळ असून भ्रष्टाचार खूप बोकाळला आहे. महागाई, बेरोजगारी हे महत्त्वाचे प्रश्न असून जनता त्यात होरपळून निघत आहे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार (Ajit Pawar) बोलत होते. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या विधानावर प्रत्युत्तर दिले. मराठवाड्याच्या वाट्याचं पाणी बारामतीत आडलं होतं असं विधान फडणवीसांनी केलं होतं.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, काही दिवसांपूर्वी वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमधून जाहिरात शिवसेनेने (Shivsena) दिली. जाहिरात त्यांनीच दिली, ती दुसऱ्या दिवशी त्यांनीच बदलली. परत म्हणतात, याच्याशी आमचा काहीच संबंध नाही, याकडे लक्ष वेधत अजित पवार म्हणाले, यांना 50 खोकेवाले म्हटल्यानंतर राग यायचा. मात्र नांदेडला भाजपनेच (BJP) डिवचले, ’50 खोके, 105 डोके’ या बॅनरमधून 50 खोक्यांचा केला जात असलेला आरोप खरा ठरत असल्याचे पवार म्हणाले.

राज्यकारभाराकडे लक्ष द्या

अजित पवार पुढे म्हणाले, आता हे म्हणताहेत, आम्ही जय-विजयची जोडी आहोत. गावाकडे बैलजोड्या असतात ‘सर्जा-राजा’ असे म्हणत त्यांनी टोला लगावला. ते म्हणाले, फेव्हिकॉलचा जोड आहोत, हे सांगण्याची वेळ तुमच्यावर का आली. यातच सारं आलं. बेरोजगारी (Unemployment), महागाई (Inflation), महिलांवरील अत्याचार (Women Abuse) असे महत्त्वाचे प्रश्न आहेत. जातीय तेढ वाढतेय, म्हणून यांना सांगावं वाटतं, राज्य कारभाराकडे लक्ष द्या, असा सल्ला त्यांनी सरकारला दिला.

फडणवीसांनी वस्तुस्थिती सांगावी

मराठवाड्याच्या वाट्याचे पाणी (Marathwada Water) बारामतीत आडलं होतं असं विधान फडणवीसांनी केलं होतं.
यावर अजित पवार म्हणाले, बारामतीत कोणतेही पाणी आडलं नाही.
कृष्णा-भीमा स्थिरीकरणाच्या (Marathwada Krishna Water Project) संदर्भात देवेंद्र फडणवीसांनी
वस्तुस्थिती सांगावी. पाणी देत असताना विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्या नेतृत्वाखाली
छत्रपती संभाजीनगर येथेच बैठका झाल्या. तेव्हा महाराष्ट्र कृष्णा विकास महामंडळाच्या
(Maharashtra Krishna Development Corporation) अधिकारात येणारं मराठवाड्याचं हक्काचं पाणी, जे उस्मानाबाद आणि बीडला मिळणार आहे, ते त्यांना मिळालं पाहिजे, असा निर्णय झाला.

म्हणून अशी वक्तव्य केली जातात

अजित पवार पुढे म्हणाले, निरेचं पाणी चंद्रभागेस न जाता इंदापूरमधील एका बोगद्याद्वारे उजनीत आलं.
उजनीतून उचलून मराठवाड्याच्या हक्काचं पाणी देण्याचा निर्णय झाला. बोगद्याचे काम होण्यास वेळ लागतो.
त्यात बारामतीचा प्रश्न कुठे आला. फक्त बारामती नाव घेतलं की, त्याला वेगळं महत्व प्राप्त होते.
ब्रेकिंग आणि डेडलाईन होते, म्हणून अशा प्रकारची वक्तव्य केली जातात.

Web Title : Ajit Pawar | the current governance of the state is sloppy corruption is rampant ajit pawars death

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | विनापरवाना गावठी पिस्टल बाळगणाऱ्या 3 गुन्हेगारांना हिंजवडी पोलिसांकडून अटक, 3 पिस्टल व 1 काडतुस जप्त

Congress Leader Mohan Joshi | राजेंद्रनगर येथील पूरग्रस्तांच्या प्रलंबित पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी – मोहन जोशी

Devendra Fadnavis | जाहिरातीवरील शरद पवारांच्या खोचक टीकेला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘अशा गोष्टींना…’

Pune Crime News | पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात भरदिवसा युवकावर गोळीबार, प्रचंड खळबळ