Ajit Pawar | अजित पवार भाजपसोबत येणार का? केंद्रीय मंत्र्याचं मोठं विधान, म्हणाले – ‘फक्त अजित पवारच नाही तर…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत (BJP) जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात (Maharashtra Political News) सुरु आहे. त्यातच अजित पवार (Ajit Pawar) यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांची दिल्लीत भेट घेतल्याचे बोलले जात आहे. अजित पवारांच्याबाबतीत वेगवेगळे नेते आपली प्रतिक्रिया देत असताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि भाजप नेते भागवत कराड (Bhagwat Karad) यांना यासंदर्भात विचारण्यात आले. त्यावर कराड म्हणाले, फक्त अजित पवारच (Ajit Pawar) नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेनेत (Shivsena) अस्वस्थता आहे.

भागवत कराड एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. त्यावेळी त्यांना अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत येणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना कराड म्हणाले, फक्त अजित पवारच नाही, तर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अस्वस्थता आहे. तसेच राष्ट्रवादीप्रमाणे काँग्रेसमध्येही (Congress) तीच परिस्थिती आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे 15 आमदार आहेत, त्यांच्यातही अस्वस्थता असल्याचे कराड यांनी सांगितले.

भागवत कराड पुढे म्हणाले, या तिन्ही पक्षांच्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे.
या अस्वस्थतेमागचं कारण म्हणजे तिकडे एकमेकांचं संगोपन नाही, एक विचार नाही.
प्रत्येक आमदाराला वाटतं आपली कामं व्हावी, परंतु त्यांच्या सरकारच्या काळातही ते झालं नाही.
त्यामुळे महाविकास आघाडीत अस्वस्थता आहे.
दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
यांचं मी अभिनंदन करेन. या नेत्यांनी राज्यात चांगली कामं केली आहेत.

Web Title :- Ajit Pawar | union minister and bjp leader bhagwat karad says political unrest in ajit pawar ncp and congress

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे-सिंहगड रोड क्राईम न्यूज : ग्रीनफिल्ड रेस्टोबारच्या दोघांवर गुंडांकडून हत्याराने सपासप वार, खुनी हल्ला करणारे तिघे ताब्यात

MNS Chief Raj Thackeray | हे प्रशासनाला कळलं नाही का?, श्री सदस्यांना श्रद्धांजली वाहत राज ठाकरेंनी सरकारला सुनावले

Maharashtra Bhushan Award | महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानंतर 11 जणांचा उष्माघाताने मृत्यू, विरोधकांकडून सरकारवर टीकास्त्र

National Commission for Minorities – Iqbal Singh Lalpura | पुणे : राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इकबाल सिंह लालपुरा यांच्या उपस्थितीत पुण्यात ‘रोजा इफ्तार’, संवाद कार्यक्रम

Shambhuraj Desai | ‘अजित पवार महायुतीत…’ शंभूराज देसाईं म्हणाले- ‘भाजप आणि आमचं टार्गेट सेट’

Pune Crime News | पुणे-धनकवडी क्राईम न्यूज : सहकारनगर पोलिस स्टेशन – पामोलिन कुत्र्याचा तु पाय मोडला आहेस म्हणत मारहाण