आदित्य ठाकरेंनी मानले अक्षय कुमारचे आभार

पोलिसनामा ऑनलाईन – कलाविश्वाप्रमाणेच समाजकार्यातही बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सक्रियपणे सहभाग घेत असतो. कोरोनाच्या संकट काळातही तो गरजुंना आणि अत्यावश्यक सेवा पुरविणार्‍या कर्मचार्‍यांना मदत करत आहे. अक्षयने मुंबई पोलिसांमध्ये फिटनेस हेल्थ ट्रॅकिंग डिवाइसचे वाटप केले आहे. या कार्याची दखल पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेत अक्षयचे आभार मानले आहेत.

नाशिक पोलिसांनंतर अक्षयने मुंबई पोलिसांमध्ये फिटनेस हेल्थ ट्रॅकिंग डिवाइसचं वाटप केले आहे. डिवाइसमुळे पोलिसांच्या शरीराचे तापमान, ऑक्सिजनची क्षमता, हृदयाचे ठोके हे तपासता येणार आहे. त्यामुळे त्याचे हे कार्य पाहून आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत अक्षयचे कौतुक करत आभार मानले आहेत. अक्षय कुमारने देशातील सशस्त्र दल, वेगवेगळ्या राज्यातील पोलीस दल यांना पाठिंबा दिला आहे. कोरोना योद्धांची काळजी घेतल्यामुळे आपले मनापासून तुमचे आभार. यावेळी आम्ही यातील काही डिवाइस बीएमसी कर्मचार्‍यांना देण्याविषयीही चर्चा केली, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.