अमृता फडणवीसांचं नवं गाणं महिला दिनी होतंय ‘लॉन्च’, ‘अलग मेरा यह रंग है’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही एक गाणं घेऊन येत आहोत. पण मला विश्वास आहे,की केवळ अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित महिला नाही तर, तर प्रत्येक महिला या गाण्यामुळे प्रभावित होतील, असे अमृता फडणवीस यांनी सांगितले. अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर हँडेलवरून याबाबत माहिती दिली असून, अलग मेरा रंग है, असे या गाण्याचे बोल असल्याचे ट्विटर वरील पोस्ट वरून दिसून येते. त्याखाली टॅगलाईन वर ‘फेस कॅन डिस्ट्रॉय बट नॉट द सोल’ केवळ चेहरा नष्ट होऊ शकतो, पण मन नाही, असे लिहण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्ष विजया रहाटकर यांच्या माध्यमातून मी अनेक अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित महिलांच्या गाठी-भेटी घेतल्या. त्यावेळी पीडित मुलींनी आपल्या व्यथा मांडल्या लोक आमची दया करतात, पण आम्हाला दया किंवा सहान भुतीची गरज नसून, आम्हाला लोकांची साथ हवीय. असे त्यांनी एका वृत्तवाहीनीच्या मुलाखतीत बोलताना सांगितले.

दरम्यान, अमृता फडणवीस या कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. त्यांनी आदित्य ठाकरेंच्या ट्विटला दिलेलं उत्तर असो किंवा शिवसेनेच्या भूमिकेवर केलेली टीका यामुळे अमृता यांना शिवसैनिकांकडून ट्रोलही करण्यात आलं. यापैकी अनेक ट्रोलर्सकडून मला शिकायला मिळत, त्यानुसार आपल्यात बदल करता येतो, असं सकारात्मक उत्तर अमृता फडणवीस यांनी दिल.