शेतकर्‍यांसाठी अर्लट ! 15 दिवसात लिंक करा Aadhaar ला PM-Kisan स्कीम सोबत, अन्यथा नाही मिळणार 6000 रूपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही शेतकरी आहात आणि तुम्हाला 6000 रुपयांच्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आधार पडताळणीसाठी तयार रहा. जम्मू-काश्मीर, लडाख, आसाम आणि मेघालयातील शेतकऱ्यांना पंतप्रधान-किसान योजनेचा पैसा घेण्यासाठी 31 मार्च 2020 पर्यंत आधार लिंक करावा लागेल. अन्यथा पैसा येणे बंद होईल. म्हणजे, यासाठी आता फक्त 15 दिवस शिल्लक आहेत. यानंतर सरकार कोणतीही संधी देणार नाही. सरकारचा हा निर्णय जम्मू-काश्मीर, लडाख, आसाम आणि मेघालयातील शेतकऱ्यांसाठी आहे. तर उर्वरित राज्यांमध्ये 1 डिसेंबर 2019 पासून आधार अनिवार्य करण्यात आला आहे.

किती शेतकऱ्यांना पैसे मिळाले- कृषी मंत्रालयाच्या मते, जम्मू-काश्मीरमधील 7,91,245 शेतकरी कुटुंबांना योजनेचे तीन हप्त्यांमध्ये पैसे मिळाले आहेत. तर दुसर्‍या टप्प्यात 2000 रुपयांच्या पहिला हप्त्या 5,75,202 शेतकर्‍यांनी घेतला आहेत.

त्याचप्रमाणे आसाममध्ये 19,97,844 शेतकर्‍यांना 2-2 हजार रुपयांचे तीन हप्ते मिळाले आहेत तर 9,53,609 शेतकर्‍यांना दुसर्‍या टप्प्यातील पहिल्या हप्त्याचे पैसे प्राप्त झाले आहेत. मेघालयात एकूण 36,951 शेतकर्‍यांना तिसरा हप्ता मिळाला तर 24,665 शेतकर्‍यांना दुसऱ्या टप्प्यात योजनेचा चौथा हप्ता मिळाला आहे.

देशाबद्दल बोलायचे म्हणले तर 14.5 कोटी शेतकरी कुटुंबांपैकी केवळ 6.44 कोटी लोकांना 2 -2 हजारांचा तिसरा हप्ता मिळाला आहे. कारण आधार अनिवार्य झाल्यानंतर लाभार्थ्यांची संख्या वेगाने वाढत नाही.

निम्म्याहून अधिक शेतकर्‍यांना रक्कम मिळाली नाही – निम्म्याहून अधिक शेतकरी त्याचा फायदा घेणाऱ्यांच्या लाईनमध्ये उभे आहेत. कागदाचा घोळ आणि आधार लिंक नसल्यामुळे बर्‍याच लोकांना पैसे मिळालेले नाहीत. अशा परिस्थितीत ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांनी त्यांचा आधार वेळेत लिंक करणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला फायदा मिळणार नाही. आधार पडताळणीशिवाय आता सरकार हे पैसे देणार नाही.

पंतप्रधान-किसान योजनेत आधार लिंक कशी करावे –

पहिले तुम्हाला पीएम किसान योजनेत दिलेल्या बँक खात्यात जावे लागेल. तेथे जाण्याआधी आधार कार्डची फोटो कॉपी आपल्यासोबत घ्या. बँक कर्मचार्‍यांना खात्यास त्यांच्या आधारशी लिंक करण्यास सांगा. आधार कार्डच्या फोटो कॉपीवर एका ठिकाणी आपली स्वाक्षरी करा.

जवळपास सर्व बँकांमध्ये ऑनलाईन आधार लिंक सुविधा उपलब्ध आहे. जिथून आपण आपले आधार लिंक करू शकता. लिंक करताना, 12 अंकी आधार क्रमांक काळजीपूर्वक टाइप करा आणि सबमिट करा. जेव्हा आपला आधार आपल्या बँक नंबरशी लिंक केला जाईल, त्यानंतर आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर संदेश पाठविला जाईल. परंतु यासाठी तुम्हाला नेट बँकिंगची सुविधा असावी.