16 मार्चपासून बंद होईल ‘डेबिट-क्रेडिट’ कार्डची ‘ही’ सुविधा, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जर तुम्ही डेबिट आणि क्रेडिट कार्डचा ऑनलाइन ट्रांजक्शनसाठी वापर करत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती खुप महत्वाची आहे. 16 मार्चनंतर काही वेगळ्याप्रकारच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डची ऑनलाइन सुविधा बंद होऊ शकते. जाणून घेवूयात काय आहे संपूर्ण प्रकार…

मागच्या काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक नोटिफिकेशन जारी केले होते. नोटिफिकेशननुसार 16 मार्च 2020 पर्यंत आपल्या क्रेडिट/ डेबिट कार्डवरून ऑनलाइन आणि कॉन्टॅक्टलेस ट्रांजक्शन केले नसेल तर ही सुविधा बंद होईल. जर तुम्हाला ही सुविधा आपल्या कार्डमध्ये जारी ठेवायची असेल तर 16 मार्चपूर्वी किमान एकदा ऑनलाइन आणि कॉन्टॅक्टलेस ट्रांजक्शन करावे लागेल. कॉन्टॅक्टलेस टेक्नॉलजीच्या मदतीने कार्ड होल्डरला ट्रांजक्शनसाठी स्वाइप करण्याची गरज नसते.

याशिवाय 16 मार्चपासून डोमेस्टिक, इन्टरनॅशनल, पीओएस ट्रांजक्शन, एटीएम ट्रांजक्शन लिमिट ऑन/ऑफ करण्याची सुविधा मिळणार आहे. आरबीआयने ही सुविधा ऑनलाइन फ्रॉडपासून वाचण्यासाठी सुरू केली आहे. याद्वारे ग्राहक स्वत:च कार्ड बंद किंवा अ‍ॅक्टिव्ह करू शकतील. याशिवाय कार्डच्या स्टेटसमध्ये कोणताही बदल झाल्यास कार्ड होल्डरला अलर्ट करण्यात येईल. आरबीआयने फ्रॉड रोखण्यासाठी सर्वप्रकारचे बदल कार्डमध्ये केले आहेत. या अंतर्गत मॅग्नेटिक स्ट्रीपवाल्या कार्डला ईएमव्ही चिपमध्ये बदलण्यात आले होते. यानंतर बँकांनी आपल्या ग्राहकांची कार्ड बदलण्यास सुरू केली होती.