माशाच्या शरिरावर दिसलं ‘अल्लाह’चं नाव, त्यानंतर किंमत लावली ‘एवढी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात एका तरुणाच्या घरी एक असा मासा मिळाला आहे ज्यावर ‘अल्लाह’ असे लिहिलेले आहे. विशेष म्हणजे आता लोक या माश्यावर बोली लावत आहेत. कैराना मधील आलकला परिसरातील हा सर्व प्रकार आहे.

मछली के शरीर पर दिखा 'अल्लाह', कीमत लगी इतनी...

सईद अहमद यांचे पुत्र शबाब अहमद ने आपल्या फिश टँकमध्ये सात आठ महिन्यापूर्वी एक छोटा मासा आणून सोडला होता. जसा जसा मासा मोठा होऊ लागला तसे तसे त्याच्यावर लिहलेले अल्लाह हे स्पष्ट दिसू लागले आणि थोड्याच अवधीत ही बातमी आसपासच्या परिसरात पोहचली. लोक या माश्याला पाहण्यासाठी शबाब अहमद यांच्या घरी पोहचू लागले. एवढेच नाही तर लोक या माश्याला विकत घेण्यासाठी बोली देखील लावत आहेत. आतापर्यंत याची किंमत पाच लाखांपर्यंत गेली आहे.

 

हा आगळावेगळा मासा संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनत चालला आहे. यासाठी रशीद खान नामक व्यक्तीने सर्वाधिक म्हणजे पाच लाखांची बोली लावली आहे. शबाब अहमद मात्र अजून किंमत वाढण्याची प्रतीक्षा करत आहेत.

 

Visit : Policenama.com