Aloe Vera Juice Benefits | रोज प्याल एलोवेरा ज्यूस तर शरीराला होतील ‘हे’ 5 फायदे; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Aloe Vera Juice Benefits | आपल्यापैकी बहुतेकांना पोटाच्या समस्या, कोरडी त्वचा, निर्जीव केस, वाढत्या वजनाचा सामना करावा लागतो. हवामान कोणतेही असो, अशा समस्या अनेकदा उद्भवता. यासाठी तुम्ही अनेक घरगुती उपाय वापरू शकता. कोरफड देखील यापैकी एक आहे. कोरफडीचा रस प्यायल्याने शरीराला आवश्यक हायड्रेशन मिळते, ज्यामुळे अनेक आजार दूर राहतात. (Aloe Vera Juice Benefits)

 

कोरफडीमध्ये अमीनो अ‍ॅसिड तसेच व्हिटॅमिन-बी12 भरपूर असते. याशिवाय कोरफडीमध्ये व्हिटॅमिन-ए, सी, ई (Vitamins) आणि फॉलिक अ‍ॅसिड देखील असते. कोरफडीचा रस पिण्याचे कोणते फायदे आहेत, ते जाणून घेवूयात.

 

कोरफडीच्या रसाचे फायदे

1. मुरुम /पिंपल्स
कोरफडीच्या रसामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. याचे सेवन केल्याने किंवा लावल्याने मुरुमांना कारणीभूत असलेले बॅक्टेरिया कमी होतात आणि त्यासोबतच मुरुमे दुखणे आणि जळजळ यामध्ये आराम मिळतो.

 

2. वजन कमी करणे
कोरफडीचा रस वजन कमी करण्यात खूप मदत करू शकतो. कोरफडीच्या रसामध्ये लिंबू किंवा मेथीची ताजी पाने देखील मिसळू शकता, याच्या सेवनाने लठ्ठपणा दूर होण्यास मदत होते.

3. पचन
कोरफडीचा रस प्यायल्याने पचनक्रिया चांगली होते. कोरफड केवळ पचनक्रिया मजबूत करत नाही तर पोटाशी संबंधित समस्या देखील दूर करते.

 

4. केस
आवळ्यासोबत कोरफडीचे सेवन केल्याने केस निरोगी आणि मजबूत होतात.

 

5. सूज
कोरफड शरीरातील सूज कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. यामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात.

 

Disclaimer : वरील मजकुरात नमूद सल्ला आणि सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहेत. तो व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून घेऊ नये. काही प्रश्न किंवा समस्या असल्यास नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

Web Title :- Aloe Vera Juice Benefits | know 6 benefits of drinking aloe vera juice everyday

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maratha Reservation | उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या घरावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धडकणार ‘लाँग मार्च’ (व्हिडिओ)

 

Mahavikas Aghadi | राष्ट्रवादी-शिवसेनेत वादाची ठिणगी ! आघाडी न करण्याची महापौरांची भूमिका

 

Vistadome Coach | मध्य रेल्वेवरील ‘व्हिस्टाडोम कोच’ना प्रचंड प्रतिसाद ! गेल्या 3 महिन्यात 20,407 प्रवाशांची नोंद, उत्पन्न रु.2.38 कोटी