Maratha Reservation | उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या घरावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धडकणार ‘लाँग मार्च’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maratha Reservation | राज्यातील ठाकरे सरकार (Thackeray Government) मराठा आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी इच्छुक नसून, सरकारला जागे करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या (Maratha Kranti Morcha) वतीने ‘शिवनेरी ते मुंबई’ असा लाँग मार्च (Long March) काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हा लाँग मार्च मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादीचे (NCP) प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर जाऊन धडकणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक (Coordinator) रमेश केरे पाटील (Ramesh Kere Patil) यांनी दिली.

 

 

राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) म्हणजे प्रस्थापित मराठ्यांचं सरकार आहे. त्यामुळे सर्वसामान्य मराठ्यांना आरक्षण (Maratha Reservation) देण्याबाबत सरकार हलगर्जीपणा करत आहे. त्यामुळे या सरकारला जागे करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगला (Varsha Bungalow), शरद पवार यांचा सिल्व्हर ओक (Silver Oak Bungalow) आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांच्या घरावर लाँग मार्च काढण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती रमेश केरे यांनी फेसबुक लाईव्हच्या (Facebook Live) माध्यमातून दिली आहे.

 

 

तसेच याबाबत सर्वनियोजन झाले असून लवकरच तारीख जाहीर केली जाणार आहे.
या लाँग मार्चसाठी अनेक संघटनांसोबत चर्चा झाली आहे. त्यासाठी पुढील आठ दिवसांत राज्यव्यापी बैठक होणार आहे.
तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्य आणि केंद्र सरकार (Central Government) एकमेकांवर चालढकल करत असून,
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे रमेश केरे यांनी सांगितले.

 

 

Web Title :- Maratha Reservation | maratha morcha long march at the house of cm uddhav thackeray and sharad pawar demanding maratha reservation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mahavikas Aghadi | राष्ट्रवादी-शिवसेनेत वादाची ठिणगी ! आघाडी न करण्याची महापौरांची भूमिका

 

Vistadome Coach | मध्य रेल्वेवरील ‘व्हिस्टाडोम कोच’ना प्रचंड प्रतिसाद ! गेल्या 3 महिन्यात 20,407 प्रवाशांची नोंद, उत्पन्न रु.2.38 कोटी

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 41 हजारांपेक्षा जास्त रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी