Ambadas Danve | महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसा निर्णय भाजपने घेतला – अंबादास दानवे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणूक (Andheri By-Election) बिनविरोध करण्याचा निर्णय भाजपने (BJP) घेतला आहे. त्यांच्या या भूमिकेवर विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी भाष्य केले आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय हा भाजपचा महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसा असा निर्णय आहे, असे अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले आहेत.

 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे- Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे दिवंगत आमदार रमेश लटके (Shivsena MLA Ramesh Latke) हे जुने आणि हाडाचे शिवसैनिक होते. लटके हे तळागाळातून आलेले नेते होते. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी दिली होती.

 

भाजप जरी आमचे विरोधक असले, तरी त्यांनी त्यांचा उमेदवार मागे घेण्याचा जो निर्णय घेतला, तो महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात मनसेच्या राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी प्रयत्न केले. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील त्यांच्या विनंतीला मान देऊन हा निर्णय घेतला आहे, त्यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे, असे अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले.

तसेच अंधेरीच्या निवडणुकीत ऋतुजा लटके यांचाच विजय होणार होता.
त्यामुळे त्यांनी माघार घेतली या विषयाला फार महत्व देण्याचे कारण नाही, असे देखील दानवे म्हणाले.
यावेळी पत्रकारांनी नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांच्या मुलांबद्दल दानवे यांना प्रश्न विचारला होता.
नारायण राणे यांनी दावा केला होता की, रमेश लटके शिंदे गटाच्या संपर्कात होते आणि त्यांना मातोश्रीने भरपूर त्रास दिला होता.
त्यावर बोलताना दानवे म्हणाले, नारायण राणे काहीही बोलत असतात.
त्यांना आणि त्यांच्या मुलांच्या वक्तव्याला जास्त महत्व देण्याची गरज नाही, असा टोला दानवे यांनी लगावला.

 

Web Title :- Ambadas Danve | BJP took a decision that suits the culture of Maharashtra – Ambadas Danve

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jayant Patil | भाजपला उशिरा सुचलेले शहाणपण आहे, अन्यथा त्यांना…, जयंत पाटलांचा भाजपला टोला

Sanjay Raut | राज ठाकरेंचे भाजपला दिलेले पत्र हा केवळ स्क्रिप्टचा भाग, संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका

Mandakini Khadse | जळगाव दूध संघातील अपहार प्रकरणात खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यावर गुन्हा दाखल