Ambadas Danve On Devendra Fadnavis | तुमच्या दिल्लीश्वर पातशहाची सवय तुम्हालाही लागली; अंबादास दानवेंनी फडणवीसांच्या ‘त्या’ घोषणांची यादीच वाचली

संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Ambadas Danve On Devendra Fadnavis | उद्या संभाजीनगरातील मंत्रिमंडळ बैठकीला (Marathwada Cabinet Meeting) येत असताना घोषणा जरा जपूनच करा. कारण आपल्या खोकेबाजीची, धोकेबाजीची नोंद तब्बल ३२ देश घेत असतात, असं म्हणतात.. तुमच्या दिल्लीश्वर पातशहाला सवय आहे शब्द फिरवायची आणि विसरायची. तीच तुम्हालाही लागली आहे, अशी घणाघती टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. (Ambadas Danve On Devendra Fadnavis)

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात २०१६ साली औरंगाबाद येथे मंत्रिमंडळ बैठक झाली होती. या बैठकीमध्ये मराठवाड्याच्या विकासासाठी ४१ हजार कोटी रुपयांचा कालबद्ध कार्यक्रम घोषित केला होता. परंतु यामध्ये घेण्यात आलेले निर्णय अजूनही अपूर्ण आहेत, अशी माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, सध्याच्या सरकारमध्ये फडणवीस सुपर सीएमच्या भूमिकेत आहेत, त्यांनी इतर अवास्तव घोषणा करण्यापेक्षा स्वतः घोषणा केलेली कामे पूर्ण करावीत. (Ambadas Danve On Devendra Fadnavis)

उद्या संभाजीनगरमध्ये मंत्री मंडळाची बैठक होत आहे यावरून राज्य सरकारवर निशाणा साधताना अंबादास दानवे यांनी २०१६ मध्ये झालेल्या बैठकीत तत्कालीन मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या घोषणांचं काय झालं? असा प्रश्न विचारत फडणवीस यांनी त्यावेळी केलेल्या घोषणांची यादी वाचून दाखवली.

अंबादास दानवे यांनी जाहीर केलेली फडणवीसांच्या पूर्तता न झालेल्या घोषणांची यादी –

  • सुमारे ४५० कोटींच्या म्हैसमाळ विकास आराखड्याचे काय झाले? आज तिथे जाण्यासाठी नीट वाटही उरलेली नाही.
  • नांदेड जिल्ह्यातील माहूरच्या विकासासाठी घोषित केलेले सुमारे २५० कोटी कुठे आहेत?
  • लातूरला विभागीय क्रीडा संकुल दिले होते, त्याचे काय झाले?
  • मराठवाड्यात डेअरी विकास बोर्डाच्या माध्यमातून १००० गावात दूध योजना आणून १.२५ लाख लोकांना रोजगार देणार होतात, त्याचे काय झाले?
  • औरंगाबादच्या करोडीला टड्ढान्सपोर्ट हब बनवणार होतात.
  • परभणी येथे ६८ एकरावर टेक्स्टाईल पार्क उभारणार होतात? त्याचे काय झाले?
  • शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबादेतील घोषित स्मारकाचे काम किती वर्षे चालणार?
  • धाराशिवच्या तेर येथे वस्तुसंग्राहलयसाठी घोषित आठ कोटींचे काम अजूनही सुरूच आहे.
  • मराठवाड्यातील वॉटर ग्रीड योजना संतगतीने सुरु आहे.
  • कृष्ण-मराठवाडा सिंचन योजनेसाठी ४८०० कोटी देणार होतात? त्याचे काय झाले?
  • सिंचन प्रकल्पांसाठी १०४८ कोटी देणार होतात.
  • नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी २८२६ कोटींची कबुली होती.
  • विमानतळ विस्तारीकरणासाठी २०० कोटीची घोषणा केली होती.
  • औरंगाबाद पॉलिटेक्निकला अभियांत्रिकी महाविद्यालयात रूपांतर करण्यासाठी एक कोटीची घोषणा केली होती.
  • लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाच्या संस्थेला २७९ कोटी देणार होतात. प्रत्यक्षात मंजूर केले फक्त १२ कोटी
  • २५ हजार हेक्टरवर फळबागा उभारण्यासाठी ३७५ कोटींची कबुली होती.
  • जालन्यात सीड पार्क साठी १०९ कोटींचा वायदा होता.

दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या टीकास्त्र सोडताना म्हटले की, तुमच्या या घोषणेची वाट पाहून आज सीड कंपन्यांची मुख्यालये हैद्राबादला स्थलांतरित होत आहेत. यंदा नव्या घोषणांच्या पूर्वी जुन्या यादीचे काय झाले हे पण सांगाल, अशी अपेक्षा मराठवाड्याच्या जनतेला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai High Court | “पत्नीने माहेरच्यांसोबत संपर्कात राहु नये अशी अपेक्षा ही मानसिक क्रूरता”
मुंबई हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण निरिक्षण

Pune Crime News | क्रेडिट कार्डची केवायसी करण्याच्या बहाण्याने पुण्यातील तरुणाची ऑनलाईन फसवणूक

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, जाब विचारणाऱ्या वडिलांना बेदम मारहाण; नाना पेठेतील घटना