चीननं जगात सोडला कोरोना व्हायरस : अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) रॉबर्ट ओ ब्रायन यांनी रविवारी म्हटले की, चीनने जगभरात घातक कोरोना व्हायरस सोडला आहे आणि बिजिंगने हे लपवण्याचा प्रयत्न मोठ्या स्तरावर केला आहे.

राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी सातत्याने शंका व्यक्त केली आहे की, वुहानमध्ये पहिल्यांदा सापडलेला कोरोना व्हायरस चीनच्या कोणत्यातरी प्रयोगशाळेतून काढण्यात आला होता.

सीबीएस न्यूजचा टॉकशो फेस द नेशनमध्ये ओ ब्रायन यांनी म्हटले, हा चीनने सोडलेला व्हायरस होता. त्यास लपवण्यात आले होते आणि एखाद्या दिवशी त्यास एचबीओवर त्याचप्रकारे दाखवला जाईल जसे चेर्नोबिल दाखवले होते.

तुम्ही चीन सरकारवर आरोप करत आहात की, स्थानिक अधिकार्‍यांवर असा प्रश्न विचारला असता ओ ब्रायन म्हणाले, आम्हाला माहित नाही, कारण त्यांनी सर्व पत्रकारांना बाहेर काढले आणि ते तपास करणार्‍यांना आतमध्ये येऊ देणार नाहीत.

ते म्हणाले, यामुळे फरक पडत नाही की, हे स्थानिक अधिकार्‍यांचे काम आहे की, चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे. त्यास लपवण्यात आले होते आणि आम्ही याच्या मुळापर्यंत जाऊ.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like