अमेरिकेनं चीन विरूध्द घेतला सर्वात ‘मोठा’ निर्णय पण जास्त ‘फटका’ भारतालाच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात मोठ्या दोन महाशक्ती असलेल्या अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्ध अजून भडकले आहे. १९९० नंतर अमेरिकेने चीनच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला असून चीनच्या चलनाला ब्लॅकलिस्ट केले आहे. अमेरिकेने जारी केलेल्या आपल्या निवेदनात म्हटले आहे कि, चीन आपल्या चलनात हेराफेरी करत असल्याचा आरोप देखील अमेरिकेने केला आहे. चीनने नुकतेच आपल्या चलनाचे अवमूल्यन केले असून यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर यामुळे चीनच्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत. चीनच्या या निर्णयाचा जगभरातील सर्वच देशांच्या चलनांवर परिणाम दिसून आला असून भारतीय रुपया देखील मागील सहा वर्षातील निच्चांकी दरावर घसरला आहे. त्याचबरोबर शेयर बाजारात देखील मोठ्या प्रमाणावर घसरण पाहायला मिळत आहे.

काय केले चीनने
मागील दशकातील सर्वात निच्चांकी स्तरावर चीनचे चलन युआन घसरले असून अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत ७ युआन पर्यंत चलन खाली आहे. जगभरातील इतर चलनांप्रमाणे काम करत नसून चीनची राष्ट्रीय बँक पीपल्स बँक ऑफ चायना हे त्यांच्या चलनाची किंमत दररोज ठरवत असते. बँक एका मध्यबिंदूवरून हि किंमत ठरवत असते.

भारतावर होणार परिणाम
चीनच्या या निर्णयाचा भारताला देखील फटका बसणार असून भारताच्या रुपयाचे यामुळे मोठ्या प्रमाणात अवमूल्यन होण्याचा धोका आहे. भारतीय रुपयाच्या होणाऱ्या अवमूल्यनामुळे भारताला तेल खरेदी करताना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर देशात महागाई वाढण्याचा देखील धोका आहे.

सामान्य जनतेवर होणार हा परिणाम
१) भारत आपल्या गरजेच्या ८० टक्के खनिजतेल आयात करतो.
२) रुपयाच्या अवमूल्यनामुळे तेल खरेदीच्या किमतीत वाढ होणार आहे.
३) तेल कंपन्या भारतात देखील याचे भाव वाढवू शकतात.
४) डिझेलच्या किंमतींत वाढ झाल्याने महागाई वाढण्याची शक्यता आहे.
५) रुपया घसरल्याने दररोजच्या वस्तू आणि डाळींचे दर घसरण्याची शक्यता आहे.

आरोग्यविषयक वृत्त –