ट्रम्प यांचा चीनला मोठा धक्का ! 3 महिन्याच्या आत TikTok ची मालमत्ता विकण्याचा बाइटडान्सला आदेश

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – गेल्या आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉक आणि वुईचॅटच्या चिनी मालकांसोबत डिलिंग करण्यावर बंदी घातली होती. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी चिनी कंपनी बाइटडान्सला TikTok अ‍ॅपचा अमेरिकेतील संपूर्ण बिझनेस विकण्याचे आदेश दिले आहेत. एवढेच नाही तर यासाठी अमेरिकेने बाइटडान्सला 90 दिवसांची मुदतही दिली आहे. ट्रम्प यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, बाइटडान्सने असे पाऊल उचलले, ज्यामुळे अमेरिकेच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. याचे विश्वासार्ह पुरवेही आहेत.

अमेरिकेने बाइटडान्साल दिलेल्या आदेशाच नेमका अर्थ काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अद्याप अमेरिकेत 10 कोटी युझर्स TikTok चा वापर करत आहेत. TikTok आणि वुईचॅटवर बंदी घालताना डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले होते की, TikTok आणि वुईचॅट अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षितता, परराष्ट्र नीती आणि अर्थव्यवस्थेसाठी धोका आहे.

बाइटडान्ससोबत मायक्रोसॉफ्टची चर्चा सुरु
ट्रम्प यानी बाइटडान्सला अमेरिकन यूझर्सकडून घेण्यात आलेल्या अथवा कोणत्याही प्रकारचा डाटा देण्यासही सांगण्यात आले आहे. अमेरिकेतील TikTok चा व्यवसाय विकत घेण्यासंदर्भात मायक्रोसॉफ्टची बइटडान्ससोबत चर्चा सुरु आहे. एवढेच नाही तर मायक्रोसॉफ्ट अथवा इतर कोणत्याही कंपनीला TikTokचा अमेरिकेतील व्यवसाय विकत घेऊ शकली नाही तर देशात TikTok बॅन करण्यासाठी 15 सप्टेंबर ही तारीख ट्रम्प यांनी निश्चित केली आहे. या संदर्भातील आदेशावरही त्यांनी स्वाक्षरी केली आहे.

चीनी कम्युनिस्ट पार्टीवर निशाणा
ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच चिनी अ‍ॅप TikTok आणि वुईचॅट 45 दिवसांच्या आत बंद करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली होती. ट्रम्प यांनी म्हटले की, डेटा कलेक्शनमुळे चिनी कम्युनिस्ट पार्टी अमेरिकन लोकांच्या खासगी महिती पर्यत पोहोचते. यामुळे चीन अमेरिकन कर्मचारी आणि ठेकेदारांची ठिकाण ट्रॅक करु शकतो. तसेच कम्युनिस्ट पार्टी खासगी माहितीचा ब्लॅकमेलिंगसाठी आणि कॉर्पोरेट हेरगीरिसाठीही वापर केला जाऊ शकतो, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.