नवजात बाळाला पिशवीत गरजेच्या सामान अन् पैशांसह फेकलं, सांभाळ करणार्‍यांसाठी लिहीलं भावनिक पत्र

अमेठी : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशच्या अमेठी जनपदमध्ये बुधवारी सायंकाळी उशीरा पीआरव्हीला माहिती मिळाली की, एका पिशवीत सामानासह कुणीतरी बाळ सोडून गेले आहे. याची माहिती कॉलरने युपी 112 ला दिली, ज्यावर पीआरव्ही 2780 राकेश कुमार सरोज आणि चालक उमेश दुबे मुंशीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्रिलोकपुर आनंद ओझा यांच्या घराजवळ पोहचले. जेथे एक अज्ञात युवक त्रिलोकपुरच्या भगवानदीनच्या पुरवा गावात एका बाळाला पिशवीत ठेवून निघून गेला होता.

मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून ग्रामस्थ जमले आणि माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी लोकांसमोर पिशवी उघडली असता त्यामध्ये मुलासाठी गरम कपडे, बूट, जॅकेट, साबण, विक्स, औषधे आणि 5 हजार रूपय आणि एक पत्र ठेवलेले आढळेल. पत्रात पित्याने बाळाचा सांभाळ करण्यास पाच हजार रूपये महिन्याला देण्याबाबत सुद्धा लिहिले आहे.

पत्रात लिहिला हा मजकूर
पत्रात लिहिले आहे की, हा माझा मुलगा आहे. यास मी तुमच्याकडे सहा-सात महिन्यांसाठी सोडत आहे. आम्ही तुमच्याबाबत खुप चांगले ऐकले आहे. यासाठी मी माझा मुलगा तुमच्याजवळ ठेवत आहे. 5000 महिन्याच्या हिशेबाने मी तुम्हाला पैसे देईन. तुम्हाला हात जोडून विनंती आहे की, कृपया या बाळाचा सांभाळ करा. माझा काहीतरी नाईलाज आहे. या मुलाची आई नाही आणि माझ्या कुटुंबात याच्यासाठी धोका आहे.

यासाठी सहा – सात महिन्यापर्यंत तुमच्याकडे ठेवा. सर्वकाही ठिक करून मी तुम्हाला भेटून माझ्या मुलाला घेऊन जाईन. कुणीतरी मुल तुमच्याकडे सोडून गेला आहे, हे कुणालाही सांगू नका. नाहीतर ही गोष्ट सर्वांना माहिती होईल, जी माझ्यासाठी योग्य नाही. सर्वांना हे सांगा की हा मुलगा तुमच्या एका मित्राचा आहे, ज्याची पत्नी हॉस्पिटलमध्ये कोमामध्ये आहे. तोपर्यंत तुम्ही तुमच्याकडे ठेवले आहे. मी तुम्हाला भेटून सुद्धा जाऊ शकलो असतो, परंतु ही गोष्ट माझ्यापर्यंत राहील तोपर्यंतच ठिक आहे, कारण माझा एकच मुलगा आहे. तुम्हाला आणखी पैसे हवे असतील तर सांगा. मी आणखी देईन. फक्त मुलाला ठेवून घ्या. याची जबाबदारी घेताना घाबरू नका. देव न करो काही वाईट घडले तर मी तुमच्यावर आरोप करणार नाही. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. मुल पंडिताच्या घरातील आहे.

पीआरव्हीने बाळ मिळाल्याची माहिती पोलिस ठाण्याचे प्रमुख मिथिलेश सिंह यांना दिली. ज्यावर त्यांनी मुलाला कॉलरकडेच सुपूर्द करण्याचा आदेश दिला. या आगळ्या वेगळ्या घटनेने परिसरात विविध प्रकारची चर्चा सुरू झाली आहे. कुणी आईला दोष देत आहे, तर कुणी बापाचे प्रेम पहात आहे. परंतु, या निष्पाप बाळाला थंडीत आई-वडिलांपासून दूर राहून शिक्षाच भोगावी लागणार आहे.