काय सांगता ! होय, लॉकडाऊनच्या काळात ‘या’ उद्योगपतीनं कमावले 3 कोटी, जाणून घ्या

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन –  जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ जेफ बेजोस यांची कमाई आता १५५ अरब डॉलर इतकी झाली आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये त्यांच्या संपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, त्यांची नेटवर्थ ११.७ लाख कोटी रुपये इतकी झाली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती समजल्या जाणाऱ्या जेफ बेजोस यांची कोरोना संसर्गाच्या संकटकाळात संपत्ती ४००० कोटी डॉलरने म्हणजेच साधारण ३.०४ लाख कोटी रुपयांनी वाढली आहे. जगभरात लॉकडाऊन सुरु होते मात्र ई-कॉमर्स कंपन्यांचा व्यवसाय सुरु होता. त्यामुळे रोजच्या वापरातील वस्तूंच्या पुरवठ्यावर कोणताही अडथळा आला नाही. याबाबतचे वृत्त ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्स ने दिलं आहे.

लॉकडाऊनच्या काळात जेफ बेजोस यांना कसा झाला फायदा?

बेजोस यांच्या वाढत्या संपत्तीचा एक महत्वाचा भाग अ‍ॅमेझॉनच्या वाढणाऱ्या शेअर्समुळे आला आहे. ज्यावेळेस इतर कंपन्यांनसमोर आर्थिक संकट होते, तेव्हा अ‍ॅमेझॉनचे शेअर्स तेजीमध्ये होते. या शेअर्स ची किंमत कोरोना संसर्गाच्या महामारीच्या कालावधीत देखील २००० डॉलरपेक्षा वर होती. तज्ज्ञांच्या मते लॉकडाऊनच्या काळात लोक घरातच असल्यामुळे त्यांनी त्यांच्या गरजेच्या वस्तू ई-कॉमर्स साईटवरून मागवणे पसंत केलं. वाढणाऱ्या मागणीमुळे ई-कॉमर्स कंपन्यांनी नवीन नियुक्ती देखील केल्याचं कळतं आहे.

अ‍ॅमेझॉन भारतात निर्माण करणार ५०,००० नोकऱ्या

अ‍ॅमेझॉन इंडियाचे प्रमुख अमित अग्रवाल यांनी मेच्या अखेरीस माहिती सांगितली होती की, ते त्यांच्या ऑपरेशन नेटवर्क मध्ये जवळपास ५०,००० सिझनल रोलसाठी नियुक्ती करत आहेत. ज्यामुळे वाढणाऱ्या मागणीचा पुरवठा करता येईल आणि सध्याच्या कठीण परिस्थितीमध्ये काही कठीण सेवा देखील पुरवता येतील. त्यांनी म्हटलं की या स्थितीत नोकऱ्या उपलब्ध करुन देण्यासाठी ते बांधील आहेत.