राहुल गांधी राम मंदिराबाबत भूमिका स्पष्ट करा : अमित शाह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात अनेक दिवसापासून राम मंदिरावर चर्चा चालू आहे. अयोधेतील राम मंदीराच्या मुद्यावरून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांना अयोध्येत राम मंदिर हवे की नको, आता त्यांनी यासंदर्भात भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हानच भाजपाचे शाह यांनी राहुल गांधी यांना दिले आहे.

अमित शहा यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन राहुल गांधी यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. शहा म्हणाले की, ‘राहुल तुम्ही स्पष्ट सांगा अयोध्येत त्या जागेवर राम मंदीर झाले पाहिजे की नाही, मी एकदम खात्रीने सांगतो की या जागेवर रामाचे भव्य मंदीरच झाले पाहिजे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उत्तराखंडच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी डेहराडून येथे रॅलीला संबोधित केले. तसेच अर्थसंकल्प सादर होत असताना मोठ्या जोशात बोलणाऱ्या विरोधकांच्या चेहऱ्यावरील तेजच गेले असल्याची टीका शहा यांनी यावेळी केली.

भाजपची ताकत वाढल्यानेच महाआघाडी – उत्तर प्रदेशमधील सपा-बसपा महाआघाडीवरुनही अमित शाह यांनी टीका केली. ते म्हणाले, महाआघाडीसाठी उत्तर प्रदेशचीही चर्चा होते, कधीही एकमेकांचे तोंड न पाहणारे, नमस्कार न करणारे, बुआ-भतीजा एकाच व्यासपीठावर आले. यांच्या एकीमुळे भाजप किती ताकतवान आहे हे स्पष्ट होते यामुळे या दोघांना एकत्र यावे लागले असल्याचेही ते म्हणाले.