‘पाकिस्तानातील मुस्लिमांना आपण नागरिकत्व का द्यायचं ?’ HM अमित शहांची ‘आक्रमक’ भूमिका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत मांडल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी याबाबत आपली भूमिका मांडली. या विधेयकाबाबत बोलताना अमित शहा आक्रमक झाल्याचे दिसून आले. पाकिस्तान आणि इतर देशातून येणाऱ्या मुस्लिमांना आपण नागरिकत्व का द्यावं ?  अशी भूमिका अमित शहांनी मांडली.

अमित शहा म्हणाले, “विधेयकावरून कोणी भीती घालत असेल तर सावध रहा. शेजारी देशात अल्पसंख्यांक कमी होत आहेत. पाकिस्तान आणि इतर देशांतून येणाऱ्या मुस्लिमांना आपण नागरिकत्व का द्यावं अशी अमित शहांची भूमिका होती. 31 डिसेंबर 2014 आधी आलेल्या नागरिकांना नागरिकता मिळणार. हे विधेयक मुस्लिम विरोधी नाही. आमच्या जाहीरनाम्याला जनादेश मिळाला. काही देशांमध्ये अल्पसंख्यांकावर अत्याचार होत आहे.” असेही त्यांनी म्हटले.

लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर आज हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात आले. यावेळी अमित शहांनी विरोधी पक्षांकडून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यानंतर राज्यसभेत या विधेयकावर मतदान पार पडले. यावेळी मतदानावर शिवसेनेने बहिष्कार टाकला. परंतू राज्यसभेत हे विधयेक मंजूर झाले आहे. यावेळी मतदानात विधेयकाच्या वतीने 125 मते मिळाली तर 105 मते विधेयकाविरोधात मिळाली.

राज्यसभेत आता हे विधेयक मंजूर झाल्याने देशीत सर्व राज्यांमध्ये हे विधेयक लागू होण्याचा मार्ग रिकामा झाला. या विधेयकाला मोठा विरोध झाला होता. परंतु आज मोदी सरकारचे महत्वाचे विधेयक अखेर मंजूर झाले आहे. त्यामुळे नागरिकत्व कायदा सुधारणा विधेयकाची परिक्षा मोदी सरकारने पास केली.

Visit : policenama.com