Amol Kolhe On Ajit Pawar | अजित पवारांच्या ‘कार्यसम्राट-नटसम्राट’च्या टीकेला अमोल कोल्हेंचे सणसणीत प्रत्युत्तर, म्हणाले – ‘पण ‘स्वकर्तृत्वसम्राट’ नक्की’

पुणे : Amol Kolhe On Ajit Pawar | आता हवेली आणि शिरुर मतदार संघाला (Shirur Lok Sabha Election 2024) ठरवायचंय, तुम्हाला कार्यसम्राट (Karyasamrat) खासदार पाहिजे की, नटसम्राट (Natsamrat) खासदार पाहिजे, अशी टीका शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) शिरूर लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यावर अजित पावार यांनी हडपसर (Hadapsar) येथील मेळाव्यात बोलताना केली होती. या टीकेला आता डॉ. अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्याच शब्दात सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे.

याबाबत डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट केली आहे. तसेच या पोस्टसोबत कोल्हे यांनी दूरदर्शन सह्याद्रीच्या इमारतीसमोरील त्यांची छायाचित्रेसुद्धा पोस्ट केली आहेत. याचा संदर्भ त्यांनी पोस्टमध्ये दिला आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, कार्यसम्राट की नटसम्राट माहीत नाही पण स्वकर्तृत्वसम्राट नक्की!
२००१ साली ‘सांगा उत्तर सांगा’ या कार्यक्रमाचा निवेदक म्हणून या वास्तूच्या पायऱ्या चढलो ते माझे ‘काका’ अभिनय क्षेत्रात होते म्हणून नाही तर स्वतःच्या टॅलेंट आणि कर्तृत्वाच्या जोरावर…

डॉ. कोल्हे यांनी पुढे लिहिले आहे की, आणि योगायोगाने आज २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार
या राजकीय पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी याच वास्तूच्या पायऱ्या चढलो…ते ही काकांच्या नाही
तर स्वकर्तृत्वाच्या जोरावर…, असे म्हणत अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले होते अजित पवार…

हडपसर येथील मेळाव्यात अजित पवार हे अमोल कोल्हे यांना उद्देशून म्हणाले होते
की, त्यांनी किती संपर्क ठेवला, किती लोकांना उपलब्ध राहिले. हे येथील जनतेला माहिती आहे.
त्यामुळे आता हवेली आणि शिरुर मतदार संघाला ठरवायचं,
तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की, नटसम्राट खासदार पाहिजे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sushma andhare | सुषमा अंधारे यांच्याविरूद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार, ‘त्या’ पत्रकार परिषदेतील छोट्या बाळाच्या उपस्थितीवर आक्षेप

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यावर गुन्हे शाखेची कारवाई, सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त