Amol Kolhe On Mahayuti Alliance | ‘पराभव समोर दिसू लागल्याने महायुतीकडून वैयक्तिक टीका’ – डॉ. अमोल कोल्हे

पुणे : Amol Kolhe On Mahayuti Alliance | धोरणात्मक मुद्दे नसल्याने महायुतीच्या नेत्यांकडून वैयक्तीक टीका केली जात असल्याच वक्तव्य महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi ) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (Sharad Pawar NCP) शिरूर लोकसभा मतदार संघाचे (Shirur Lok Sabha) अधिकृत उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलं.

महाविकास आघाडी व इंडिया फ्रंट आघडी लोकसभा निवडणूक 2014 च्या अधिकृत उमेदवारांची प्रचार शुभारंभ सभा आज पुण्यात पार पडली. या सभेपुर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. कोल्हे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर शांताई हॉटेल समोर महाविकास आघाडीतील तिन्ही उमेदवारांसाठी प्रचारची शुभारंभ सभा घेण्यात आली.

जेष्ठ नेते मा. शरदरचंद्रजी पवार, काँग्रेसचे नेते मा. पृथ्वीराज चव्हाण, मा. बाळासाहेब थोरात, मा. मोहन जोशी, या सभेला बारामती आणि पुणे लोकसभेचे उमेदवार सुप्रिया सुळे, रवींद्र धंगेकर, विश्वजित कदम, मा. संग्राम थोपटे, मा. संजय जगताप, शिवसेनेचे मा. सुषमा अंधारे, मा. सचिन आहेर,  आपचे नेते अजित पाटील, मा.भूषणसिंहराजे गजेंद्रसिंहराजे होळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. अमोल कोल्हे पुढे म्हणाले, प्रचाराची दुसरी आणि तिसरी फेरी सुरू असताना देशातील आणि राज्यातील जनतेचे ठरले
की, स्वाभिमानाने तुतारी फुक्याची आणि मशाल पेटवायची.
पण मला धोरणात्मक मुद्दे नसल्याने महायुतीच्या नेत्यांकडून वैयक्तीक टीका केली जात आहे.

मला नटसम्राट म्हणले जाते, कार्य सम्राट परवडतो पण खोके सम्राट ,पलटी सम्राट चालत नाही.
कचाकचा बटन दाबा तुम्हाला हवा तेवढा निधी देतोझ या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचाही डॉ. कोल्हे यांनी चांगलाच समाचार घेतला.
लोकशाहीची थट्टा करता का सवाल करत , तुम्ही जो निधी देणार म्हणून सांगता तो तुमचा नाही तर जनतेचा पैसा आहे.
स्वतःची मालकी असल्या सारखे वागत असाल तर हा कर त्याच दोन टक्के लोकांकडून घेत जावा.
सत्तेची मस्ती, गुर्मी कोठून येते असा थेट सवाल ही डॉ. कोल्हे यांनी केलाय.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shirur Lok Sabha | अमोल कोल्हे यांनी शिरूरसाठी दाखल केला उमेदवारी अर्ज, प्रमुख नेत्यांची उपस्थिती, जोरदार शक्तीप्रदर्शन (Video)

Baramati Lok Sahba | सुप्रिया सुळे यांनी प्रचंड शक्तिप्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला (Videos)

Ajit Pawar NCP MLA | अजित पवारांच्या आमदाराचे खळबळजनक वक्तव्य, सहा महिन्यानंतर महायुती तुटणार? बारणेंच्या अडचणी देखील वाढू शकतात