Sachin Vaze Case : अमृता फडणवीस यांचे शिवसेनेवर टीकास्त्र, म्हणाल्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आताही त्यांनी सचिन वाझे प्रकरणावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

फडणवीस यांनी ट्वीट करून राज्यातील कोरोना परिस्थिती आणि वाझे प्रकरणावर भाष्यं केले आहे. एकीकडे नागपूर शहरात कोरोनाबाधित रुग्णांना दाखल करण्यासाठी रुग्णालयांत जागा मिळत नाही. तर दुसरीकडे ठाकरे सरकार कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार करून उद्योगपतींना धमक्या देऊन त्यांच्याकडून वसुली करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी आपल्या काही खास पंटराकडून योजना आखत आहे, असे म्हणत फडणवीस यांनी वाझे यांची तुलना पंटराशी केली आहे.

यापूर्वी देखील अमृता फडणवीस यांनी सुशांत सिंह राजपूत आणि कंगना रनौत प्रकरणावरून त्यांनी यांनी ठाकरे सरकारवर टीका केली होती. यावेळी त्यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावरही संशय व्यक्त केला होता. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलाच वाद पेटला होता. त्यानंतर आरे प्रकल्पावरूनही अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली होती.