Amruta Fadnavis | ‘…म्हणून केंद्रीय तपास यंत्रणांचा तपास सुरू’; अमृता फडणवीस यांचं मोठं वक्तव्य!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Amruta Fadnavis | राज्यात सध्या तपास यंत्रणांचं धाडसत्र चालू आहे. यावरून सत्ताधारी नेते भाजपवर जोरदार निशाणा साधत असून भाजप (BJP) यंत्रणांचा गैरवापर करत असल्याची टीका त्यांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर जहरी टीका केली आहे.

 

पुरावे (Evidence) आहेत म्हणून केंद्रीय तपास यंत्रणांचा (Central Investigation Agency) तपास सुरू असल्याचं अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच त्यांनी, महाराष्ट्रात आज जी परिस्थिती आहे,  मै खाऊंगा भी, खिलाऊंगा भी और खानेवाली की रक्षा करुंगा, अशी आहे, हे बंद व्हायला हवं, असंही अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) म्हणाल्या.

 

आम्हाला फक्त एकच अपेक्षा आहे ती म्हणजे महाराष्ट्रात प्रगतीचं राजकारण व्हावं, भ्रष्टाचार बंद व्हावा, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. अमृता फडणवीस यांनी केलेल्या टीकेवर महाविकास आघाडीमधील नेत्यांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

दरम्यान, अमृता फडणवीस कोणत्या ना कोणत्या वक्तव्यामुळे कायम चर्तेत असतात.
त्यासुद्धा ठाकरे सरकारवर टीका करत असतात. अनेकदा त्या त्यांच्या वक्तव्यांमुळे सोशल माध्यमांवर ट्रोल झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात.

 

Web Title :- Amruta Fadnavis | BJP leader devendra fadanvis wife amruta fadnavis criticizes thackeray government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Schools Open in Maharashtra | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! राज्यातील शाळा 100 टक्के उपस्थितीसह सुरु होणार

 

Punit Balan Group | तिसरी ‘एस. बालन टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! पुनित बालन ग्रुप संघ, केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी कामगिरी

 

Pune NCP | ‘सर्व सामान्यांच्या खिशावर दरोडा टाकणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध’, पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन (व्हिडिओ)

 

7th Pay Commission | मोदी सरकारने दिले फिटमेंट फॅक्टरबाबत मोठे अपडेट ! इतकी वाढू शकते सरकारी कर्मचार्‍यांची बेसिक सॅलरी

 

IPL 2022 | आयपीएल सामने खेळवले जाणाऱ्या स्टेडिअमची दहशतवाद्यांकडून खरच रेकी झाली?, मुंबई पोलिसांनी केला खुलासा