Amruta Fadnavis Bribery Case | ‘देवेंद्र फडणवीस स्वत: गृहमंत्री, चौकशी करुन सत्य जनतेसमोर आणा’ – नाना पटोले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Amruta Fadnavis Bribery Case | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच आणि ब्लॅकमेल (Blackmail) करण्याचा प्रयत्न केल्याचा (Amruta Fadnavis Bribery Case) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचे पडसाद सभागृहात उमटले. याप्रकरणी एका मुलीला अटक (Arrest) करण्यात आली आहे. हे प्रकरण गंभीर आहे, त्याची चौकशी करुन जे सत्य असेल ते उघड झाले पाहिजे. मात्र राज्याचा गृहमंत्रीच सुरक्षित नसेल तर राज्यातील जनता कशी सुरक्षित असेल? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांनी उपस्थित केला आहे.

नाना पटोले म्हणाले, सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना गोवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपये लाच देण्याचा प्रयत्न (Amruta Fadnavis Bribery Case) केल्याची माहिती त्यांनी सांगितली. फडणवीस आणि त्या संबंधित परिवाराशी जुने संबंध असून, फडणवीस मुख्यमंत्री असतानापासूनचे त्यांचे सबंध आहेत. सत्तेत असताना आणि नसतानाही फडणवीस यांच्या कुटुंबाचा आणि ज्यांच्यावर ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला आहे, त्या कुटुंबाचा संबंध होता, असे खुद्द फडणवीस सांगत आहेत. यामागे काही राजकीय नेते आणि पोलीस अधिकारीही असल्याचा त्यांचा आरोप आहे. आम्हाला एवढेच सांगायचे आहे की, देवेंद्र फडणवीस स्वत: गृहमंत्री आहेत, पोलीस यंत्रणा त्यांच्याकडे आहे, त्यांनी या प्रकरणाची चौकशी करुन वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, असे नाना पटोले म्हणाले.

धिरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नका

बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री (Dh irendra Shastri) यांचा वसई-विरार येथे 18 व 19 मार्च धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastriला कार्यक्रम होत असल्याची माहिती आहे. धिरेंद्र शास्त्री यांनी जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा अपमान करणारी विधानं केली आहेत. त्यामुळे लाखो वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांच्या कार्यक्रमाला राज्य सरकारने (State Government) परवानगी देऊ नये, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

महाराष्ट्र पुरोगामी विचारांचे राज्य

महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे, अंधश्रद्धेला आपल्या राज्यात अजिबात थारा नाही.
महाराष्ट्राने तसा कायदाही केला आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या तसेच संत तुकाराम महाराज
यांचा अपमान करणाऱ्या धिरेंद्र शास्त्री यांच्या मीरा रोड येथील कार्यक्रमाला परवानगी दिली
तर जनतेची दिशाभूल करुन त्यांच्या भावनांशी, श्रद्धेशी खेळ मांडला जाऊ शकतो,
असेही नाना पटोले म्हणाले.

Web Title : Amruta Fadnavis Bribery Case | ‘Devendra Fadnavis
himself Home Minister, investigate and bring the truth before the public’ – Nana Patole

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

MLA Sunil Tingre | पुणे महापालिकेत समाविष्ट गावांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही ! आमदार सुनिल टिंगरे यांच्या लक्षवेधीवर मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Pune PMC To FDA Administration | एफडीए ने अन्न परवाना नूतनीकरणावेळी व्यावसायीकांना पाणी पुरवठा विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र (NOC) बंधनकारक करावे; महापालिका आयुक्तांचे FDA प्रशासनाला पत्र